Potholes App: रस्त्यातील खड्ड्यांचा त्रास? आता थेट गोवा सरकारकडे तक्रार करा; कसं ते जाणून घ्या

दुरूस्त केलेले खड्डे याचा फोटो आणि माहिती संबधित तक्रारदाराला दिली जाईल.
Patholes App
Patholes AppDainik Gomantak
Published on
Updated on

गोव्यातील रस्त्यांची झालेली दुरावस्था यामुळे वाहनचालक हैराण झाले आहेत. सरकार रस्ते दुरूस्ती आणि वाहतूक सुरळीत होण्याकडे पुरेसे लक्ष देत नसल्याची तक्रार वारंवार सामान्य नागरिक करत असतात. या तक्रारीकडे सरकारी यंत्रणा दुर्लक्ष करतात. पण, यापुढे रस्त्यातील खड्यांबाबत थेट गोवा सरकारकडे तक्रार करता येणार आहे. विशेष म्हणजे याची तात्काळ दखल देखील घेतली जाणार असून, दुरूस्तीला प्राधान्य दिले जाणार आहे.

Patholes App
Sunburn 2022 Video: तयारी पूर्ण... पाहा सनबर्न फेस्टिव्हलची पहिली झलक

सार्वजनिक बांधकाम मंत्री निलेश काब्राल यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी (union Minister Nitin Gadkari) यांच्या हस्ते गुरूवारी एक अ‍ॅप लॉन्च केले जाणार आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून गोव्यातील रस्त्यावर पडलेल्या खड्यांची तक्रार केली जाऊ शकते. तक्रार केल्यानंतर तात्काळ त्याची दखल घेतली जाईल. यामध्ये तीन प्रकारच्या खड्यांचे वर्गीकरण करण्यात आले आहे.'

'मानवनिर्मीत खड्डे, बांधकाम खात्यामुळे निर्माण झालेले खड्डे (उदा. पाईपलाईन दुरूस्ती) आणि तिसरे म्हणजे रस्ते झिजल्यामुळे किंवा निकृष्ट कामामुळे पडलेले खड्डे. अशा तीन प्रकारात खड्ड्यांचे वर्गीकरण केले जाईल. यापैकी रस्ते झिजल्यामुळे किंवा निकृष्ट कामामुळे पडलेले खड्डे दुरूस्तीला प्राधान्य दिले जाईल. त्यानंतर इतर तक्रारी घेतल्या जातील.' असे निलेश काब्राल (PWD Minister Nilesh Cabral) म्हणाले.

Patholes App
Goa Petrol Price: कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ, गोव्यात पेट्रोल-डिझेल किती महागले?

तक्रार केल्यानंतर त्याठिकाणाचे जिओटॅगिंग केले जाईल. तक्रार केल्यानंतर तीन दिवसात तक्रारीची दखल घेतली जाईल. खड्डे दुरूस्तीला मान्सून किंवा इतर समस्यांमुळे कधी कधी वेळ लागू शकतो असे काब्राल यांनी म्हटले आहे. सुरूवातीला कनिष्ठ अभियंत्याने तक्रारीला गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. त्यानंतर ते वरिष्ठ अभियंत्याकडे ती तक्रार जाईल. कुणीच दखल घेतली नाही तर संबधित अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल असेही काब्राल म्हणाले.

जेट पॅचरच्या मदतीने खड्डे बुझवण्याचे काम केले जाईल व दुरूस्त केलेले खड्डे याचा फोटो आणि माहिती संबधित तक्रारदाराला दिली जाईल. हेच अ‍ॅप अपग्रेड करून त्यावर पाणी लिकेज यासारखी तक्रार देखील करता असे काब्राल यांनी स्पष्ट केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com