Panaji Smart City Work: पणजीतील स्मार्ट सिटी अभियानांतर्गत जागोजागी रस्ते खोदण्यात आले आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना गोवेकरांना करावा लागत आहे. ही रखडलेली कामे कधी पूर्ण होणार याबाबत नागरिक सरकारला सवाल करत आहेत.
याबाबत मुख्यमंत्र्यांनी काल स्वत: या कामांची पाहणी केली असून पावसाळ्यातही सिमेंटच्या रस्त्यांचे काम सुरूच राहणार असल्याचे सांगितले. तसेच, सीवरेज लाईन टाकण्याचे आणि काँक्रीट रस्ता बांधण्याचे काम पावसाळ्यातच हाती घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
यापूर्वी ऑक्टोबरमध्ये प्रकल्पांचे नियोजन करण्यात आले होते. याबाबत मुख्यमंत्री म्हणाले की, 4.3 किमी लांबीचा काँक्रिटचा रस्ता तयार करण्यात येणार आहे. एकीकडे मंत्री नीलेश काब्राल यांच्यामते, यंदाच्या पावसाळ्यात रस्ते पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे, असे सांगण्यात येत आहे, तर दुसरीकडे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यामते या पावसाळ्यात अशी कोणतीच समस्या निर्माण होणार नसून पणजीत पूर येणार नाही असे त्यांचे म्हणणे आहे.
आम्ही पावसाळ्यात स्मार्ट सिटीची कामे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ही कामे पीडब्ल्यूडी, सीवरेज कॉर्पोरेशन आणि गोवा राज्य नागरी विकास संस्था करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, ऑक्टोबरनंतर पणजीत धूळ असणार नाही आणि त्यामुळे सरकारला सर्व रस्ते खुले करण्यास मदत होईल. पूर येऊ नये म्हणून नाल्यांची साफसफाई देखील करण्यात आली असून, दोन नाले मांडवीला जोडण्यासाठी जलसंपदा विभागाला लघु निविदा काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सावंत यांनी संबंधित अधिकाऱ्यांसमवेत काकुलो मॉलजवळील स्मार्ट सिटीच्या कामांची पाहणी केली.
आम्ही कामांचा आढावा घेतला तेव्हा आमच्या लक्षात आले की ऑक्टोबरमध्ये रस्ते खोदणे शहाणपणाचे नाही. आम्ही पावसाळ्यात काँक्रीट रस्त्याचे काम हाती घेऊ.
लोकांना आधीच अडचणींचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे पावसाळ्यात सीवरेज लाईन टाकता आली तर काँक्रीट रस्त्याचे कामही हाती घेता येईल. ब्रेक घेतलेल्या मजुरांना बोलावण्याचे निर्देश कंत्राटदारांना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.