Water Shortage Problem in Mormugao: सध्या राज्यातील अनेक भगत पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली असून यामुळे गोवेकर हैराण झाले आहे. मुरगाव तालुक्यातील अनेक भागात मंगळवारी सलग तिसऱ्या दिवशी पाणीटंचाई निर्माण झाली. दक्षिण गोव्यात सोमवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसाचा फटका साळावली जलशुद्धीकरणाच्या वीजपुरवठ्यावर पडल्याने त्याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर झाला.
बायणा येथे सार्वजनिक बांधकाम विभागाने कंत्राटी पद्धतीने भाड्याने घेतलेला एकमेव पाण्याचा टँकर जनतेची मागणी पूर्ण करू शकला नाही, कारण तो पाचहून अधिक फेऱ्या करू शकला नाही.
6,000 ते 8,000 लिटर पाणी वाहून नेणाऱ्या टँकरच्या प्रत्येक प्रवासासाठी 1,000 ते 1,600 रुपये मोजून जनतेला खाजगी टँकरचा आधार घ्यावा लागला. याबाबत रहिवाशांनी साबांखा विभागाच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली.
एक रहिवासी म्हणाले की, पीडब्ल्यूडी संकटकाळात नागरिकांची सार्वजनिक मागणी पूर्ण करण्यात अयशस्वी ठरले. एका टँकरने aकाही फायदा नाही. पीडब्ल्यूडीने मागण्या पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त तरतुदी करायला हव्या होत्या.
पीडब्ल्यूडीचे सहाय्यक अभियंता नरेश पैंगीणकर म्हणाले की, मंगळवार रात्रीपर्यंत पाणीपुरवठा पूर्ववत होईल. बुधवारी सकाळपर्यंत प्रत्येक घरात पाणी पोहोचेल याची आम्ही खात्री करू.
दरम्यान, वाळपईमध्ये देखील अशीच समस्या निर्माण झाली होती. म्हाऊस पंचायत क्षेत्रात गेल्या पंधरा दिवसांपासून पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गावात नळाला पाणी नसल्याने नागरिकांचे पाण्याविना हाल होत आहेत. त्यात टॅंकर आठ दिवसातून एकदा येत असल्याने गावातील रहिवासी नाराज झाले होते. पर्यायी लोकांना पाणी विकत घेऊन प्यावे लागत आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.