CM Dr. Pramod Sawant on Employment
CM Dr. Pramod Sawant on Employment Dainik gomantak
गोवा

Goa Budget Session 2023 : बेरोजगारी दूर करण्यासाठी सरकारचे प्रयत्न : मुख्यमंत्री डॉ. सावंत

दैनिक गोमन्तक डिजिटल

राज्यातील खासगी क्षेत्रात पुढील दोन वर्षांमध्ये 20 हजार रोजगारनिर्मिती केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत दिली.

राज्यात गेल्या काही वर्षांपासून होत असलेल्या बेरोजागारीच्या मुद्यावरून विरोधक आमदार क्रुझ सिल्वा (आप), एल्टन डिकॉस्ता (काँग्रेस) व विजय सरदेसाई (गोवा फॉरवर्ड) यांनी मांडलेल्या खासगी सदस्य ठरावावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले.

गोव्यात मोठ्या प्रमाणात वाढत असलेल्या बेरोजगारीवरून विरोधकांनी ठराव मांडून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला असता मुख्यमंत्र्यांनी उत्तर देताना ही बेरोजगारी कमी करण्यासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून राज्यामध्ये कौशल्यपूर्ण मनुष्यबळ तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

युवकांना कुशल बनविण्यासाठी राज्य सरकारने विविध अभ्यासक्रम सुरू केले आहेत. मात्र, त्यातील काही अभ्यासक्रमांना युवा पिढीकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही, असे स्पष्ट केले.

राज्यात खासगी क्षेत्रातील कामगारांच्या वेतनावरही सरकारकडून विचार केला जाईल. सध्या या क्षेत्रातील उद्योगामध्ये कामगारांना देण्यात येणाऱ्या वेतनाबाबतचा आढावा घेतला जाईल व त्यात सरकारकडून अधिक वेतनाबाबत शिफारस केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी या ठरावाला उत्तर देताना सांगितले.

राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी आहेत. मात्र, त्यासाठी कौशल्यपूर्ण मनुष्यबळ विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे पुढील दोन वर्षांत खासगी क्षेत्रात अधिकाधिक रोजगारनिर्मितीसाठी राज्य सरकारने पावले उचलली आहेत.

त्यामुळे बेरोजगारांना नोकऱ्यांच्या शोधात राज्याबाहेर जाण्याची गरज भासणार नाही. भविष्यात आदरातिथ्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत.

- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kala Academy: गोविंद गावडे कोणाला वाचवत आहेत? सल्लागाराकडे दाखवले बोट

Kala Academy Viral Video: मंत्र्यांसारखे कला अकादमीचे लाईट्स रंग बदलतात; राजदीपचा मुख्यमंत्र्यांना इशारा

Goa Congress: पर्रीकरांनी विश्वास घातकी म्हटले त्याच गॉडमनला भाजपात प्रवेश; मोदी परिवारात देशद्रोही लोक - पाटकर

Afghanistan: बंदूकधाऱ्याची क्रूरता! नमाज पठन करणाऱ्या 6 जणांची केली हत्या; शिया समुदयाच्या मशिदीला बनवले लक्ष्य

Goa Abduction Case: राजस्थानच्या व्यक्तीचे माडेल, थिवीतून अपहरण; जीवे मारण्याची धमकी देत लुटमार

SCROLL FOR NEXT