Mandrem News : युरिकोचे धैर्य कौतुकास्पद !

युरिको डायस याने दाखविलेल्या निःस्वार्थीपणाचे तसेच धाडसाचे कौतुक
Rohan Khaunte
Rohan KhaunteGomantak Digital Team

पणजी : मांद्रे येथील एका हॉटेलातील तंबूमधील डच विदेशी पर्यटक महिलेचा विनयभंग व तसेच खुनाचा प्रयत्न करणाऱ्या हल्लेखोरांपासून बचाव करताना जखमी झालेल्या युरिको डायस व पीडित विदेशी महिलेची पर्यटनमंत्री रोहन खंवटे तसेच पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी गोमेकॉत जाऊन त्यांची व्यक्तिशः भेट घेऊन विचारपूस करून सर्व ती मदत देण्याचे आश्‍वासन दिले.

गोव्यातील पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी त्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून दाखवलेल्या धाडसाबद्दल तसेच गोव्याची प्रतिमा मलिन होण्यापासून बचाव केल्याने त्याचे विधानसभेत अभिनंदन करण्यात आले.

युरिको डायस याने दाखविलेल्या निःस्वार्थीपणाचे तसेच धाडसाचे कौतुक आहे. पर्यटकांवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे गोव्याचे नाव बदनाम होऊ लागले आहे. ही घटना जर घडली तर आंतरराष्ट्रीय स्तरावर गोव्याची प्रतिमा डागाळली गेली असती.

डायसने पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी गोमंतकीय कोणताही धोका पत्करू शकतात हे दाखवून दिले. या हल्ल्यातील जखमी डायस व पीडित विदेशी महिलेला खात्यातर्फे सर्व ते सहकार्य करू.

रोहन खंवटे, पर्यटनमंत्री

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com