CM Pramod Sawant Gomantak Digital Team
गोवा

CM Pramod Sawant : 'G २०' बैठकीत महिला प्रणित स्टार्टअप

महिलांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलीय उत्पादने

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी : गोव्यात मंगळवार ९ ते ११ मे दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या विकास कार्यगटाच्या बैठकीच्या सोबतच भारताच्या महिला प्रणीत उपक्रमाचे दर्शन घडवणारे  ‘एको’- सुरक्षित हवामान आणि आरोग्यकारक अर्थव्यवस्था जास्तीत जास्त संधी निर्माण करते,  या विषयावर महिला आणि बालविकास मंत्रालयाने परराष्ट्र मंत्रालयाच्या सहकार्याने एक प्रदर्शन आयोजित केले.

‘एको’ ही संकल्पना महिला प्रणीत विकास आणि शाश्वत विकासात त्यांची महत्त्वाची भूमिका यांना प्रतिबिंबित करते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्‍घाटन झाले यावेळी मुख्यमंत्री आणि पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी या महिलांचे कौतुक केले.

राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्थेने या प्रदर्शनाची व्यवस्था केली होती. यामध्ये महिलांच्या नेतृत्वाचे महत्त्व आणि कशा प्रकारे महिलाप्रणीत विकास हा लिंग समानता आणि शाश्वत भविष्याचा पाया आहे,  यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.

जागतिक आर्थिक वृद्धीमध्ये आणि शाश्वत विकासाची उद्दिष्टे विशेषतः एसडीजी ५ साध्य करण्यामध्ये महिलांच्या अतिशय महत्त्वाच्या आणि अपरिहार्य भूमिकेच्या प्रभावाचे प्रतिबिंब या प्रदर्शनातून पाहायला मिळते. या प्रदर्शनात हातमाग आणि वस्त्रोद्योगाशी संबंधित जिन्नस,  हस्तकला, मसाले,आयुर्वेदिक उत्पादने आणि भरड धान्यापासून तयार केलेले खाद्यपदार्थ यांसारखी पूर्णपणे महिलांच्या संकल्पनेतून आणि रचनांद्वारे तयार करण्यात आलेली उत्पादने मांडण्यात आली होती.

या प्रदर्शनाच्या इतर काही वैशिष्ट्यांमध्ये खेळणी तयार करणाऱ्या,  विणकाम करणाऱ्या,  तंत्रज्ञानाची हाताळणी करणाऱ्या महिलांच्या थ्रीडी हॉलोग्रामसह डिजिटल अनुभव,कारागिरांकडून त्यांच्या कलेचे प्रत्यक्ष सादरीकरण करण्यात आले. आयुर्वेदिक डॉक्टरांकडून प्रकृतीची तपासणीसाठी विभागही ठेवण्यात आला आहे.

महिलाप्रणीत स्टार्टअप

भारतातील विविध राज्यांमधील महिला प्रतिनिधी,  राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ,वस्त्रोद्योग मंत्रालय,  चहा मंडळ, मसाले मंडळ, अंबी उद्योगिनी प्रतिष्ठान, उन्नती फाउंडेशन,  महिला बचत गट आणि सी-६, जल सखी आणि डिजिटल सखी यांसारखे महिलाप्रणीत स्टार्टअप यामध्ये सहभागी झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: कुंकळ्ळीतील 100 घरांवर पडणार हातोडा! हायकोर्टाचा आदेश

Raechelle Banno: 'IFFI ला माझ्या चित्रपटाने सुरुवात झाली हे पाहून आनंद झाला'; बेटर मॅनच्या अभिनेत्रीने भूमिकेच्या दबावाबद्द्ल मांडले मत

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

Goa Government: गोवा सरकारचा मोठा निर्णय; अपघातग्रस्तांना 10 लाखापर्यंत मिळणार नुकसान भरपाई

Sunburn Festival: हा सूर्य हा जाळ

SCROLL FOR NEXT