Stray Dogs Attack: राज्यात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट! पर्यटकांवरही हल्ले; प्रशासनाने लक्ष घालण्याची मागणी

मारिया झपाटा: घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सरकारने या भटक्या कुत्र्यांचा ताबडतोब बंदोबस्त करावा
Stray Dogs Attack on Tourists
Stray Dogs Attack on TouristsDainik Gomantak
Published on
Updated on

Stray Dogs Attack on Tourists: संपूर्ण देशाबरोबरच गोव्यातही मागील काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांनी हल्ला करण्याच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाल्याचे दिसून आले आहे. स्थानिक रहिवाश्यांसोबतच इथे फिरायला येणाऱ्या पर्यटकांबाबतही अशा घटना घडत असल्याने त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्पेनमधील मारिया झपाटा या पर्यटक महिलेवर भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर तिने आपले मत व्यक्त केले आहे.

Stray Dogs Attack on Tourists
धक्कादायक! सासष्टी, मुरगावच्या शेकडो शिधापत्रिकाधारकांना किडलेला व बुरशी आलेल्या तांदळाचे वाटप

मारिया हिने तिच्यावर झालेल्या हल्ल्याचा भीषण अनुभव स्थानिक वृत्तसंस्था टाईम्स ऑफ इंडियासोबत शेअर केला आहे. त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, मारिया रविवारी संध्याकाळी काणकोणमधील राजबाग बीचवर फेरफटका मारत असताना, समुद्राच्या लाटांसोबत खेळत असताना चार भटकी कुत्री तिला तिच्या दिशेने येताना दिसली आणि बघता बघता त्या चार कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला केला.

या अचानक झालेल्या हल्ल्यानंतर मारिया खूप घाबरून गेली. जसजशी ही चार कुत्री तिला तिच्या दिशेने येताना दिसली, तसतशी ती पाण्यात आत जाऊ लागली. मात्र तरीही त्या कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला करत तिच्या दोन्ही पायांचा चावा घेतला. यामध्ये तिच्या दोन्ही गुडघ्यांना गंभीर जखम झाली आहे.

जवळजवळ 20 मिनिटे हा प्रकार सुरूच असल्याचे तिने सांगितले. काही केल्या ती भटकी कुत्री तिथून जात नव्हती. शेवटी हा प्रकार तिथेच असलेल्या एका स्थानिकाच्या निदर्शनास आला आणि त्याने काठीच्या मदतीने त्या कुत्र्यांना हाकलवून लावले.

त्यानंतर मारियाला तिथल्या सार्वजनिक आरोग्य केंद्रामध्ये नेण्यात आले आणि तिच्या जखमांवर उपचार करण्यात आले. याबाबत ती म्हणते, माझ्यावर इथे मोफत उपचार करण्यात आले. मी त्यांना याचे पैसे देऊ केले, पण त्यांनी घेतले नाही.

आता मी काठीशिवाय बीचवर जाऊच शकत नाही...

खरेतर गोव्यात निवांत वेळ घालवण्यासाठीच परदेशातील पर्यटक येत असतात. संध्याकाळच्या वेळी समुद्रावर चालणे इथे आलेल्या प्रत्येक पर्यटकाच्या आवडीची गोष्ट असते. मात्र अशा काही घटनांमुळे या निवांत वेळेला गालबोट लागते.

या हल्ल्यानंतर मारिया सांगते की, ती इथून पुढे कधीही बीचवर नुसतीच फिरू शकत नाही. यानंतर बीचवर फिरताना मी काठी घेऊनच फिरेन. याबाबत तिने स्थानिक प्रशासनाने या गोष्टीत लक्ष देण्याची विनंती केली आहे. ती म्हणते, जर तिला वेळीच मदत मिळाली नसती तर पुढे काय झाले असते माहित नाही. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचे हे हल्ले जीवघेणे ठरू शकतात. म्हणूनच घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सरकारने या भटक्या कुत्र्यांचा ताबडतोब बंदोबस्त करावा.

या आधीही काही पर्यटकांवर असे हल्ले झाले आहेत. या आधी पाळोळे बीचवर ब्रिटेनमधून आलेल्या एका पर्यटकाच्या बाबतीतही असा प्रकार घडला होता. त्यावेळी त्याने सांगितले की, जर असे प्रकार आमच्या देशात घडले असते तर प्रशासनाने दुसऱ्याच दिवशी याचा बंदोबस्त केला असता.

या वाढत्या प्रकारामुळे पुन्हा एकदा सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com