Goa CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

Pramod Sawant: आता भाजपचे लक्ष्य २७ प्लस

Goa Politics: व्यवस्थित व्यूहरचना आखली तर २०२७च्या निवडणुकीत २७ पेक्षा जास्त जागा जिंकणे शक्य आहे, असे मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

गोमन्तक डिजिटल टीम

लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोव्यात विजय मिळाला म्हणून विरोधक आता २०२७ सालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये विजय मिळविण्याची स्वप्ने पाहू लागले आहेत. पण वस्तुस्थिती वेगळी आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला २७ मतदारसंघांत आघाडी मिळाली आहे. जर आम्ही व्यवस्थित व्यूहरचना आखली तर २०२७ सालच्या निवडणुकीत २७ पेक्षा जास्त जागा जिंकणे शक्य आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज मडगावात केले.

‘धन्यवाद मतदार, अभिनंदन मतदार’ कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात ५० हून अधिक मतदारांचा सत्कार करण्यात आला. मतदारांनी मते दिली म्हणून आम्ही दोन लाखांपेक्षा जास्त मते मिळवू शकलो. सासष्टीतील सहा मतदारसंघांत जी मते विरोधकांना मिळाली, ती आम्हाला इतर मतदारसंघांत भरून काढता आली नाहीत, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: कॅश फॉर जॉब प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची गरज नाही; DGP आलोक कुमार

Cash For Job Scam: दोन सरकारी कर्मचाऱ्यांसह 33 जणांना अटक; राजकीय कनेक्शनबाबत गोवा पोलिसांनी केला महत्वाचा खुलासा

Goa Crime: चोरीची तक्रार केली म्हणून रेस्टॉरंट मालकाचा काढला काटा; सहा वर्षानंतर दोघांना जन्मठेप, 1 लाख दंड

Cash For Job प्रकरणात सत्तरीतील युवकाला अटक! डिचोलीतील पाचजणांकडून उकळले 21.5 लाख

Jaipur - Goa Flight: पर्यटकांसाठी खूशखबर! गुलाबी शहरातून गोव्यासाठी सुरु होणार आणखी एक फ्लाईट

SCROLL FOR NEXT