Goa Assembly Session | CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Session: पुढच्या विधानसभा निवडणुकीआधी अनुसूचित जमातींना आरक्षण

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची विधानसभेत ग्वाही

Akshay Nirmale

Goa Assembly Session 2023: राज्यात अनुसूचित जमातींना (ST) पुढच्या विधानसभा निवडणुकीआधी आरक्षण देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी, विधानसभेत दिले.

मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, अनुसूचित जमातींना आरक्षण देण्यास आमचे सरकार तयार आहे. 2027 च्या विधानसभा निवडणुकीआधी अनुसूचित जमातींना आरक्षण मिळवून देऊ. त्यासाठी केंद्र सरकारकडे पत्रव्यवहार केला जाईल.

केंद्राकडे मतदारसंघ पुनर्रचना आयोगाची रचना करावी, अशी मागणी केली जाईल. एकदा हा मतदारसंघ पुनर्रचना आयोग तयार झाला की, अनुसूचित जमातींना विधानसभेत आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. आम्ही याचा पाठपुरावा करत राहू आणि आरक्षण मिळवून देऊ.

राज्यात अनुसूचित जमातींनी (ST) आरक्षणाचा मुद्दा गेल्या काही काळापासून गाजत आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधीही अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा म्हणून संबंधित संघटनांनी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, गोवा फॉरवर्ड पक्षाचे आमदार विजय सरदेसाई यांची भेट घेतली होती.

या दोन्ही नेत्यांना निवेदन देऊन हा विषय विधानसभेत मांडण्याची विनंती शिष्टमंडळाने केली होती. त्यावर दोन्ही नेत्यांकडून शिष्टमंडळाला तसे आश्वासनही देण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

विरोधी पक्षांचे नेते 'नर्व्हस' की 'ओवरकॉन्फिडेंट'? स्वार्थासाठी युती तोडली, भाजपला आयती संधी!

Horoscope: नशीब चमकणार! आजचा दिवस 'या' 3 राशींसाठी ठरणार अतिशय शुभ; कारण... आदित्य-मंगल योग

Goa Today News Live: लुथरा बंधु थायलंडमधून डिपोर्ट; दिल्लीत दाखल झाल्यानंतर गोवा पोलिस दोघांना घेणार ताब्यात

Dabolim Airport: दाबोळी विमानतळावर 'ड्राय रन' सराव, धुक्यामुळे उद्भवणाऱ्या व्यत्ययासंदर्भात भागधारकांशी ऑपरेशनल तयारीबाबत चर्चा

IPL 2026: 66 दिवस, 84 सामने... 'आयपीएल 2026'चा थरार 'या' तारखेपासून, फायनलची तारीखही जाहीर

SCROLL FOR NEXT