Goa Tenant Verification Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: ..नंतर कोणाचीही गय केली जाणार नाही! भाडेकरू पडताळणीवरून मुख्यमंत्र्यांचा इशारा

Tenant Verification In Goa: राज्यात भाडेकरू पडताळणी धोरण अवलंबल्यानंतर सर्वत्र भाडेकरू पडताळणी सुरू आहे. अजूनही भाडेकरू नोंदणी करायची शिल्लक असल्याने पुढील चार-पाच दिवसांत लोकांनी आपल्याकडील भाडेकरूंची पडताळणी नोंदणी पोलिस स्थानकात करून घ्यावी.

गोमन्तक डिजिटल टीम

साखळी: राज्यात भाडेकरू पडताळणी धोरण अवलंबल्यानंतर सर्वत्र भाडेकरू पडताळणी सुरू आहे. गुरूवार, १० ऑक्टोबर ही यासाठी अखेरची तारीख होती. परंतु अजूनही भाडेकरू पडताळणी नोंदणी करायची शिल्लक असल्याने पुढील चार-पाच दिवसांत लोकांनी आपल्याकडील भाडेकरूंची पडताळणी नोंदणी पोलिस स्थानकात करून घ्यावी. त्यानंतरही कोणी केली नसल्यास पोलिस थेट संबंधित मालकांवर दंडात्मक कारवाई करतील, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळीत पत्रकारांशी बोलताना सांगितले.

गोव्यात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या गुन्ह्यांवर अंकुश ठेवण्यासाठी तसेच गुन्हा केल्यानंतर खऱ्या गुन्हेगारांची माहिती पोलिसांकडे रहावी या उद्देशाने पोलीस खात्याकडून भाडेकरू पडताळणी नोंदणी केली जात आहे. गोवेकरांच्या सुरक्षिततेसाठीच ही मोहीम राबविण्यात आली असून त्यास लोकांनीही सहकार्य करावे.

पोलिस खाते यासाठी लोकांना सहकार्य करीत आहे. या नोंदणीसाठी पोलीस रू. २०० घेत असल्याची अफवा काहींनी उठवली आहे. ती त्यात तथ्य नसून अफवांना बळी न पडता लोकांनी स्वतःहून आपल्याकडील भाडेकरूंची पडताळणी नोंदणी करावी, त्यांचे ओळखपत्र पोलिसांकडे द्यावे. यासाठी पुढील ४-५ दिवस अतिरिक्त घेऊ शकतात. परंतु नंतरही पडताळणी केली नसल्याचे आढळल्यास पोलिस दंडात्मक कारवाई करतील. कोणाचीही गय केली जाणार नाही,असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.दरम्यान,म्हापसा पोलिस स्थानकासमोर पडताळणीसाठी गर्दी झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT