CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Pramod Sawant: गोवा कोकणी अकादमीसाठी लवकरच इमारत -मुख्यमंत्री प्रमोद सावंत

कोकणी विश्र्व संमेलनाचे आयोजन होणे गरजेचे आहे. हे संमेलन गोव्यात आयोजित करण्यास सरकार सर्वतोपरी सहकार्य करील, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली.

दैनिक गोमन्तक

Pramod Sawant: कोकणी भाषेच्या क्षेत्रात जे कार्य सुरू आहे, ते जगभरातील कोकणी लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. त्यासाठी कोकणी विश्र्व संमेलनाचे आयोजन होणे गरजेचे आहे. हे संमेलन गोव्यात आयोजित करण्यास सरकार सर्वतोपरी सहकार्य करील, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळुरू येथे केली.

विश्र्व कोकणी केंद्राने आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या समारोप सोहळ्यात ते बोलत होते. गेल्या चार वर्षांत गोव्यात कोकणीसाठी जरी मोठे काम होऊ शकले नसले, तर लवकरच कोकणी अकादमीसाठी इमारत उभारली जाईल. येथे कोकणीच्या विकासासाठी लागणारी साधनसुविधा उपलब्ध करून दिली जाईल, असे ते म्हणाले.

इतर राज्यांतही कोकणीची रुजवण

कोकणी भाषेची रुजवण इतर राज्यांतील लोकांमध्ये झाली पाहिजे. त्यातून कोकणी भाषिक एकत्र येतील व भाषेच्या विकासासह संस्कृतीच्या विकासालाही हातभार लागेल.

सर्व कोकणी भाषिकांनी आपसांत कोकणी बोलावी, लिहावी व वाचावी, जेणेकरून पुढील पिढीमध्ये कोकणीबद्दल प्रेम निर्माण होईल व कोकणीचे संवर्धनही होऊ शकेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

नाटक, सिनेमांद्वारे कोकणीचा विकास

कोकणीचा आठव्या परिशिष्टात समावेश झाल्याने तिला राष्ट्रीय ओळख प्राप्त झाली. कोकणीच्या विकासासाठी पुष्कळ वाव असून नाटक, सिनेमांद्वारेही कोकणीचा विकास होत आहे.

गोवा विद्यापीठातही कोकणीतून पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू झाला आहे. त्याचा लाभ गोव्यासह इतर राज्यांतील कोकणी भाषिकांनी घ्यावा, असे आवाहन सावंत यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: रवि प्रदोष आणि मासिक शिवरात्रीचा दुहेरी योग! 'या' राशींवर महादेवांची विशेष कृपा, यश-समृद्धीचे संकेत

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

SCROLL FOR NEXT