पणजी: विकसित गोव्याचे स्वप्न साकार करताना गोव्याला सिंगापूर बनवायचे नाही, तर गोवा हा गोवाच राहिला पाहिजे. त्याला चमकविण्याचे काम आपले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले.
जुने गोवे येथे झालेल्या ‘सागर मंथन ५.०’ या कार्यक्रमात ते बोलत होते. गोव्यातील पर्यटनावर त्यांनी सांगितले की, कोविडनंतर पर्यटकांची संख्या वाढलेली आहे. स्थानिक युवक पर्यटन क्षेत्रात येत आहेत आणि या संख्येत वृद्धी होत आहे. सांस्कृतिक पर्यटनालाही आम्ही प्रोत्साहन देत आहोत. नवीन उपक्रम, तंत्रज्ञान आणि संशोधनाच्या माध्यमातून गोव्यात जे काही करता येईल ते आम्ही करीत आहोत.
खाण व्यवसायावर सावंत म्हणाले, खाण व्यवसाय राज्यात पुन्हा सुरू करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. पर्यावरणाचे संरक्षण करूनच हा व्यवसाय पुढे नेला जाणार आहे. पुढील ३० वर्षांच्या कालावधीसाठी १७ खाण ब्लॉक लिलावाद्वारे दिले गेले आहेत. खाण व्यवसाय सुरू झाल्यानंतर राज्याच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केले.
गोव्यात (Goa) बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर युवक रोजगार नोंदणी कार्यालयात नोंदणी करतात. येथील युवकांना सरकारी नोकरी प्राप्त करणे हेच मनात बसले आहे. पर्यटन आणि मॅन्युफॅक्चरिंगमध्ये अनेक संधी आहेत. विशेष बाब म्हणजे खासगी क्षेत्रात नोकरी करीत असला किंवा दुबईत जरी तो काम करीत असला तरी तो युवक रोजगार कार्यालयात नाव नोंद करीतो, असेही त्यांनी नमूद केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.