Goa Assembly Election 2027: डिचोलीतून विधानसभा निवडणूक लढवणारच, तेही राजकीय पक्षाच्या चिन्हावर; सनी मानकर यांची मोठी घोषणा

sunny mankar bicholim assembly election: निवडणुकीसंदर्भातील आपली भूमिका स्पष्ट करताना सनी मानकर यांनी कोणत्या राजकीय पक्षाच्या उमेदवारीवर निवडणूक लढविणार, ते मात्र गुलदस्त्यात ठेवले आहे.
sunny mankar bicholim assembly election
sunny mankarDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

डिचोली: मी डिचोली मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणूक लढवणारच, असे उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते चैतन्य (सनी) मानकर यांनी स्पष्ट करून अपक्ष म्हणून नव्हे, तर राजकीय पक्षाच्या निशाणीवर डिचोलीतून विधानसभा निवडणूक लढविणार, असे जाहीर केले.

निवडणुकीसंदर्भातील आपली भूमिका स्पष्ट करताना सनी मानकर यांनी कोणत्या राजकीय पक्षाच्या उमेदवारीवर निवडणूक लढविणार, ते मात्र गुलदस्त्यात ठेवले आहे. वेळ येताच म्हणजेच पुढील महिन्यात निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या राजकीय पक्षाचे नाव जाहीर करणार असे सनी मानकर यांनी सांगतानाच प्रमुख राजकीय पक्ष आपल्या संपर्कात आहेत, असे स्पष्ट केले.

sunny mankar bicholim assembly election
Bicholim Group Clash: धावस्करवाडा-कारापूरमध्ये दोन गटांत तुफान राडा; 7 जखमी, आठ दुचाकींची तोडफोड

राजकीय पक्षाच्या निशाणीवर निवडणूक लढविण्याची घोषणा केल्याने, सनी मानकर डिचोलीतून (Bicholim) अपक्ष की राजकीय पक्षाच्या उमेदवारीवर निवडणूक लढविणार या चर्चेला तूर्त पूर्णविराम मिळाला आहे. आज समर्थक कार्यकर्त्यांसमवेत डिचोलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सनी मानकर यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली. गेल्या काही दिवसांपासून मी डिचोली मतदारसंघात घरोघरी भेट देत असून प्रत्येक ठिकाणी मला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, असा दावा सनी मानकर यांनी केला. दिवाळीपासून आजपर्यंत मी डिचोलीतील ८ हजार ३२० घरांना भेटी देऊन लोकांच्या गाठीभेटी घेतल्या, असेही सनी मानकर यांनी सांगितले.

sunny mankar bicholim assembly election
Bicholim: डिचोली मंदिर परिसरात कोसळली झाडाची फांदी, अनर्थ टळला; वीजखांब मोडला, अडीच तास वीजपुरवठा खंडित

‘लवकरच राजकीय रणनीती’

मी मूळ पुणे-महाराष्ट्र येथील असलो, तरी वास्तव्याला डिचोलीत आहे. मी समाजसेवेचे व्रत स्वीकारले असून जनसंपर्क तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांसह अन्य माध्यमातून गेल्या एक वर्षाहून अधिक काळापासून डिचोली परिसरात माझे कार्य जोरात सुरू आहे. जनतेकडूनही मला चांगला प्रतिसाद मिळत आहे. डिचोलीतील प्रमुख समस्या जनतेकडून मी जाणून घेतल्या आहेत. राजकारणाच्या माध्यमातून समाजसेवा वाढवावी. या हेतूने मी २०२७ ची विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी करत आहे. लवकरच राजकीय रणनीती जाहीर करणार असल्याचेही मानकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.