CM Pramod Sawant, Zuari Bridge Tower  Dainik Gomantak
गोवा

Zuari Bridge Tower: गोव्याचा 360 डिग्री व्ह्यू, ओपन रेस्टॉरंट! 'झुआरी ब्रीज टॉवर' ची वैशिष्ट्ये; मुख्यमंत्र्यांकडून गडकरींवर स्तुतीसुमने

CM Pramod Sawant: पुढील २५ वर्षांचा विचार करून प्रकल्प हाती घेत आहे. जेणेकरून विकसित भारत व स्वयंपूर्ण गोवा उपक्रमांना पाठबळ मिळेल असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Sameer Panditrao

वास्को: प्रखर नेतृत्व व दूरदर्शी नेतृत्व लाभल्याशिवाय ‘टेहळणी मनोरा आणि निरीक्षण गॅलरी’सारखे प्रकल्प होऊ शकत नाहीत. आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रखर नेतृत्व व मंत्री नितीन गडकरी यांचे दूरदर्शी नेतृत्व लाभले आहे. त्यामुळेच देशाचा चौफेर विकास होत असून गोव्यात अशाप्रकारचा देशातील पहिला प्रकल्प साकारणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

कुठ्ठाळी येथील नवीन झुआरी पुलावरील टेहळणी मनोरा आणि निरीक्षण गॅलरी प्रकल्पांच्या पायाभरणी सोहळ्यात ते बोलत होते. डॉ. सावंत यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी हे विदेशात प्रवास करताना नेहमी नवीन गोष्टी पाहतात.

त्यानंतर त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट भारतात व्हावी यासाठी ते प्रयत्न करतात. नवीन संकल्पनासाठी ते गोव्याला प्राधान्य देतात. त्यांना गोवा आपुलकीचा वाटतो. गोव्यात ते निरनिराळ्या संकल्पना घेऊन प्रकल्प आणतात, असे सांगितले.

डबल इंजिन सरकारमुळे कोणती व किती विकासकामे झाली आहेत याची लोकांना जाणीव आहे. त्यामुळे विरोधकांच्या अफवांना ते बळी पडत नाहीत. आम्ही काही ठिकाणी चुकलो, तर त्याची दुरुस्ती करण्याचा धीटपणा दाखवतो.

काहीजणांना रस्त्यावरील लहान खड्डा दिसतो, परंतु मोठमोठे प्रकल्प त्यांच्या नजरेस येत नाहीत. त्यांनी नजर बदलण्याची गरज आहे. आम्ही पुढील २५ वर्षांचा विचार करून प्रकल्प हाती घेत आहे. जेणेकरून विकसित भारत व स्वयंपूर्ण गोवा उपक्रमांना पाठबळ मिळेल असेही मुख्यमंत्री म्हणाले.

‘गडकरींचे नेहमी गोव्याला झुकते माप’

मंत्री गडकरी यांनी गोव्याला नेहमी झुकते माप दिले आहे. त्यामुळे गोव्यात आत्तापर्यंत ३३ हजार कोटींची कामे झाली आहेत. बरेच पर्यटक गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा पाहण्यासाठी जातात, परंतु गोव्यातील टॉवर्स व गॅलरीचे काम पूर्ण झाल्यावर पर्यटकांचे पाय गोव्याकडे वळतील. गोव्यातील पर्यटक कमी झाले असे म्हटले जाते, ते येणाऱ्या काळात दुप्पट होतील यात शंका नाही. या प्रकल्पामुळे अर्थव्यवस्थेला ऊर्जा मिळेल, रोजगार वाढेल. या प्रकल्पामध्ये स्थानिकांना प्राधान्य मिळणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

‘गडकरींचे सहकार्य गोवा विसरणार नाही’

श्रीपाद नाईक यांनी गडकरी यांचे साहाय्य व सहकार्य गोवेकर विसरणार नसल्याचे सांगितले. विकासासाठी जे काही पाहिजे ते गडकरी यांनी दिल आहे. या प्रकल्पामुळे पर्यटक वाढणार आहेत. काहीजणांना गोव्याचा विकास पाहवत नाही. त्यांच्यापासून सावध राहण्याची गरज आहे. आम्हाला पर्यटक वाढीसाठी एकजुटीने प्रयत्न करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.

मनोऱ्याची अफलातून वैशिष्ट्ये

पहिला उंच टेहळणी मनोरा

प्रकल्पावर २७०.०७ कोटींचा खर्च

समुद्र सपाटीपासून १२८ मीटर उंच

तीन मजल्यांची प्रशस्त वास्तू

पहिला मजला : पार्किंग, नाईट क्लब, हॉटेल व रेस्टॉरंट

दुसरा मजला : ओपन रेस्टॉरंट

तिसरा मजला : आर्ट गॅलरी आणि ३६० डिग्रीने गोवा पाहता येईल

पुलावर जाण्यासाठी वॉक-वे असतील

प्रकल्पातून रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध

हा प्रकल्प गोव्याच्या अर्थव्यवस्थेसाठी ठरणार बुस्ट

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT