Chimbel Flyover Dainik Gomantak
गोवा

Chimbel Flyover: ..अखेर चिंबल उड्डाणपुलाच्या एक लेनचे लोकार्पण! उर्वरित काम सहा महिन्यांमध्ये पूर्ण करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

CM Pramod Sawant: मुख्यमंत्री म्हणाले की, २०१४ ते २०२४ या दहा वर्षांच्या कालावधीत राज्य सरकारने अनेक विकासकामे हाती घेतली असून पर्वरी रस्ता आणि मडगाव बगलमार्ग यासारखे महत्त्वाचे प्रकल्प लवकरच पूर्ण होणार आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

CM Pramod Sawant Opens Chimbel Flyover

पणजी: सांताक्रुझ मतदारसंघातील चिंबल येथील उड्डाणपुलाच्या एक बाजूच्या लेनचे मंगळवारी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या प्रकल्पात एका लेनसाठी ४२ कोटी रुपये खर्च करण्यात आले असून उर्वरित भाग सहा महिन्यांत पूर्ण होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री सावंत यांनी दिली.

यावेळी सांताक्रुझचे आमदार रुडॉल्फ फर्नांडिस, पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात, सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता ज्यूड कार्व्हालो, पंचायत सरपंच व इतर लोक उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, २०१४ ते २०२४ या दहा वर्षांच्या कालावधीत राज्य सरकारने अनेक विकासकामे हाती घेतली असून पर्वरी रस्ता आणि मडगाव बगलमार्ग यासारखे महत्त्वाचे प्रकल्प लवकरच पूर्ण होणार आहेत. चिंबल जंक्शनवरील या पुलामुळे रुग्णवाहिकांनाही आपत्कालीन स्थितीत वेळेवर रूग्णांना रुग्णालयांत पोहोचवता येणार आहे. मडगाव बगलरस्त्याचे बांधकाम येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आमदार रुडॉल्फ फर्नांडिस यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानून सांगितले की, भाजप सरकारने गोव्यात विकासाचा नवा अध्याय लिहिला आहे. त्यांनी लोकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. यापूर्वी गोव्यात निधी येत नव्हता, मात्र आता भाजप सरकार भेदभाव न करता विकास करत आहे,असेही आमदार रुडॉल्फ फर्नांडिस म्हणाले.

उद्‍घाटन करताच रूग्णवाहिका दाखल

मुख्यमंत्र्यांनी फित कापून उड्डाण पुलाचे लोकार्पण केल्यांनतर लगेच येथून रुग्णवाहिका पणजी मार्गे आली. त्यामुळे या पुलाचे लोकार्पण अप्रत्यक्षपणे रुग्णवाहिकेने केल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही मान्य केले. त्यांनी आपल्या भाषणात त्याचा उल्लेखही केला.

उड्डाण पुलाला ‘मामी’चे नाव देणार : रुडॉल्फ

मुख्यमंत्री प्रमोद सावंत कार्यक्रम संपवून गेल्यानंतर आमदार रुडॉल्फ फर्नांडिस यांनी पत्रकारांना सांगितले की, मी मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे. त्यांनी या पुलाला व्हिक्टोरिया फर्नांडिस यांचे नाव देण्याचे मान्य केले आहे. त्यांनी तसे आश्वासनही मला दिले आहे. त्यामुळे लवकरच ‘मामी’चे नाव या पुलाला लाभेल,अशी ग्वाही रुडॉल्फ यांनी लोकांना दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT