पणजी : गोव्यात नाईट कर्फ्यूच्या चर्चांना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अखेर तूर्तास पूर्णविराम दिला आहे. नववर्षाच्या निमित्ताने गोव्यात आयोजित करण्यात येणाऱ्या पार्टींना (New Year Party) परवानगी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे, मात्र यासाठी काही अटीही गोवा सरकारने घातल्या आहेत.
गोव्यात नववर्षाच्या पूर्वसंध्येला ठिकठिकाणी पार्ट्यांचं आयोजन केलं जातं. या पार्ट्यांमध्ये नियमांची सर्रासपणे पायमल्ली होत असते. या पार्ट्यांच्या आयोजनावर सरकारने निर्बंध (Restrictions) आणलेले नसून पार्टीत सहभागी होणाऱ्यांसाठी मात्र काही अटी घालण्यात आल्या आहेत. कोरोना लसीचे दोन्ही डोस पूर्ण केलेल्या किंवा कोरोना निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट असल्यासच पार्टीत प्रवेश दिला जाणार आहे.
न्यू ईअर पार्टीमध्ये नियमांचं उल्लंघन झाल्यास त्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी (CM) दिले आहेत. पार्टी सुरु असलेल्या ठिकाणी पोलिसांची करडी नजर असेल, तसेच कोणीही नियम तोडण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. तूर्तास गोव्यात नाईट कर्फ्यूचा विचार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे.
ओमिक्रॉन या कोरोना गोव्यात व्हेरियंटने शिरकाव केला असून एक रुग्ण नुकताच सापडला आहे. चिंतेची बाब म्हणजे, गोवा राज्यात संक्रमण दर (पॉझिटिव्हिटी रेट) दररोज वाढत आहे. अशा पार्श्वभूमीवर तज्ज्ञ समितीने दिलेल्या शिफारशी डावलून पर्यटन हंगामाचे निमित्त पुढे करून राज्यात तूर्तास रात्रीची संचारबंदी (Restrictions) (नाईट कर्फ्यू) लावणार नसल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.