CM Pramod Sawant | Dubai Icons Dainik Gomantak
गोवा

Goa Investment: गोव्यात गुंतवणूकीसाठी मुख्यमंत्र्यांची 'अमेझिंग' चर्चा! 'दुबई आयकॉन्स'ला खास निमंत्रण

CM Pramod Sawant: मुख्यमंत्र्यांनी दुबई आयकॉन्स समूहातील उद्योजक आणि गुंतवणूकदारांना या परिषदेला उपस्थित राहून गोव्यात गुंतवणूक करण्याचे निमंत्रण दिले, तसेच त्यांनी पंतप्रधान मोदींच्या मोहिमेला पूरक ठरत गोवा सरकार ‘मेक इन गोवा’ उपक्रमावर भर देत असल्याचेही नमूद केले.

गोमन्तक डिजिटल टीम

Pramod Sawant Aims to Attract More Investments from Dubai

पणजी: गोव्यात गुंतवणूक वाढवण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दुबईच्या आयकॉन्सच्या शिष्टमंडळासोबत भेट घेतली. या बैठकीत आगामी ८ ते १० नोव्हेंबरला आयोजित होणाऱ्या ‘अमेझिंग गोवा’ जागतिक व्यवसाय परिषदेच्या विविध पैलूंवर चर्चा करण्यात आली.

मुख्यमंत्र्यांनी दुबई आयकॉन्स समूहातील उद्योजक आणि गुंतवणूकदारांना या परिषदेला उपस्थित राहून गोव्यात गुंतवणूक करण्याचे निमंत्रण दिले, तसेच त्यांनी पंतप्रधान मोदींच्या ‘मेक इन इंडिया’ मोहिमेला पूरक ठरत गोवा सरकार ‘मेक इन गोवा’ उपक्रमावर भर देत असल्याचेही नमूद केले.

बैठकीला उद्योग सचिव स्वेतिका सचन, गोवा पर्यटन संचालक सुनील अंचिपका, उद्योगाचे विशेष अधिकारी मनोज पाटील आणि व्हायब्रंट गोवा फाउंडेशनचे अध्यक्ष राजकुमार कामत, व्हायब्रंट गोवा फाउंडेशनचे अध्यक्ष अरमान बंक्ले, अमेझिंग गोवाचे अध्यक्ष विनय वर्मा, बीएमआर इनोव्हेशन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीधर बेवारा आणि व्हायब्रंट गोवा फाउंडेशनचे इतर अधिकारी उपस्थित होते.

चर्चेचे प्रमुख मुद्दे

गोवा सरकार व्यवसायासाठी अनुकूल वातावरण तयार करण्यासाठी प्रयत्नशील.

पर्यटन, तंत्रज्ञान, उत्पादन, आरोग्यसेवा इत्यादी क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीच्या अनेक संधी उपलब्ध

गोवा सरकार दुबईच्या आयकॉन्ससारख्या गुंतवणूकदारांसोबत सहकार्य करण्यास उत्सुक

अमेझिंग गोवा परिषदेत गुंतवणूकदारांना गोव्यातील संधींची माहिती देण्याचे आश्वासन

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: "Fu..." पराभवाच्या रागात ऋषभ पंतने ओलांडली मर्यादा; लाईव्ह मुलाखतीत वापरली आक्षेपार्ह भाषा! धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

Shukra Gochar 2026: शुक्राचे आर्द्रा नक्षत्रात गोचर! 5 भाग्यवान राशींवर होणार पैशांचा पाऊस आणि सुखवृद्धी; लव्ह लाइफसाठी सुवर्णकाळ

Goa Bison Car Accident: गोव्यात धावत्या कारला गवा रेड्याची जोरदार धडक, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली; चालक थोडक्यात बचावला!

VIDEO: "याच्या ओव्हरअ‍ॅक्टिंगचे 50 पैसे कापा" मोहम्मद रिझवान अन् लिटन दास यांच्यात जोरदार बाचाबाची; बांगलादेशी खेळाडूंनी उडवली खिल्ली

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाच्या चर्चेदरम्यान मोदी सरकारचा मोठा निर्णय, 'या' सरकारी कर्मचाऱ्यांची लागली लॉटरी; ओल्ड पेन्शन स्कीमचा मिळणार फायदा

SCROLL FOR NEXT