CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant : घाडीवाडा-सुर्लात सौरऊर्जा पथदीप

जि. पं. निधीचा वापर ः अनेक वर्षांची मागणी मुख्यमंत्र्यांकडून पूर्ण

गोमन्तक डिजिटल टीम

साखळी मतदारसंघातील घाडीवाडा-सुर्ला येथील रस्त्यावर कायम अंधाराचे साम्राज्य होते. तेथे पथदीप बसविण्याची मागणी अनेक वर्षांपासून स्थानिक नागरिक करत होते. अखेर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पंचायत निधीतून या ठिकाणी सौरऊर्जा पथदीप उभे करून हा परिसर व रस्ते प्रकाशमान करण्यात आला. यामुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या योजनेचे उद्‌घाटन केले. यावेळी जिल्हा पंचायत अध्यक्ष सिद्धेश नाईक, पाळी जिल्हा पंचायत सदस्य गोपाळ सुर्लकर, सरपंच विश्रांती सुर्लकर, माजी सरपंच चंद्रकांत घाडी, उपसरपंच भोला खोडगीणकर, सखाराम घाडी, सुभाष फोंडेकर, मनोहर वळवईकर, जगा गावकर, शंकर घाडी, मंगलदास उसगावकर, श्रीपाद घाडी आदी उपस्थित होते.

फोंडेकर यांनी सदर योजनेची सविस्तर माहिती दिली. सिद्धेश नाईक यांनी मुख्यमंत्र्यांचे सहकार्य मिळत असल्याचे सांगितले. गोपाळ सुर्लकर यांनी लोकांची मागणी पूर्ण झाल्याने समाधान व्यक्त केले. सूत्रसंचालन सुभाष फोंडेकर यांनी केले तर चंद्रकांत घाडी यांनी आभार मानले.

मानवी विकास महत्त्वाचा!

ग्रामीण भागातील लोकांसाठी उपयोगी कामे करतानाच शेवटच्या माणसापर्यंत पोहचून त्याला योग्य मार्गदर्शन देणे, प्रगतीच्या मार्गावर आणणे गरजेचे आहे. फक्त बांधकामे केली, म्हणजेच संपूर्ण विकास होत नाही, तर मानवी विकासही महत्त्वाचा आहे. या रस्त्यावरून रात्रीच्या वेळी जाणाऱ्या लोकांना अंधारामुळे वाटणारी भिती जिल्हा पंचायत सदस्य गोपाळ सुर्लकर यांनी जिल्हा पंचायत निधीतून प्रकल्प राबवून दूर केली आहे, अशी कामे अपेक्षित आहेत, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT