CM Pramod Sawant | Goa News Dainik Gomantak
गोवा

CM Sawant Big announcement: साळगावात उभारणार आशियातील सर्वात्तम घनकचरा प्रकल्प

कुंडईत बायोमेडिकल कचरा प्रक्रिया प्रकल्प ही मार्गी लागणार

दैनिक गोमन्तक

गेल्या काही दिवसांपासून राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी असलेले प्रकल्प यामध्ये घनकचरा प्रकल्प, बायोमेडिकल कचरा, केमिकल वेस्ट प्रक्रिया प्रकल्प या समस्यांवरुन नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. यावरुन नागरिकांनी निदर्शने करण्याची भुमिका घेतली आहे. याची दखल घेत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी देखील यापैकी काही प्रकल्पांना भेट देत पाहणी केली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आज मोठी घोषणा केली आहे.

(CM Pramod Sawant has announced that Asia's largest solid waste plant will be set up at Saligao)

मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, राज्यात साळगाव घनकचरा प्रकल्प समस्या लवकरच सोडवली जाणार आहे. केवळ सोडवली जाणार नाही, तर साळगावात आशियातील सर्वात्तम घनकचरा प्रकल्प उभारला जाईल. याबरोबरच कुंडईत बायोमेडिकल कचरा प्रक्रिया प्रकल्प व पिसुर्लेत केमिकल वेस्ट प्रक्रिया प्रकल्प प्रस्तावित आहे. हे प्रकल्प देखील लवकरच मार्गी लावले जाणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात चर्चेत असलेला साळ नदी प्रदुषणची समस्या सोडवली जाणार आहे. तसेच येत्या दीड ते दोन वर्षात सांडपाणी प्रकल्प व्यवस्थितरीत्या सुरू होतील असे आश्वासन ही त्यांनी दिले आहे. त्यामूळे राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या समस्यांवर नागरीकांना आश्वासित केले आहे. त्यामुळे नागरीकात समाधानाचे वातावरण आहे. तसेच विरोधी पक्षांना ही चर्चेचे मुद्दे संपवले आहेत. त्यामुळे विरोधक मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनांवर काय भुमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT