Kala Academy Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Kala Academy : घोटाळा नाहीच; कला अकादमीचे काम ‘क्लिन’

विजय सरदेसाईंच्या श्‍वेतपत्रिका मागणीनंतर मुख्यमंत्र्यांचा निर्वाळा

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Kala Academy : कला अकादमी नूतनीकरण बांधकामाच्या भ्रष्टाचारावरून मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अन्यथा मुख्यमंत्र्यांनी त्यांना मंत्रिमंडळातून काढावे. तसेच आतापर्यंतच्या कामाची श्‍वेतपत्रिका सादर करण्याची मागणी गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी केली. त्यावर बांधकामात कोणताच घोटाळा झालेला नाही. आगामी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात कला अकादमी कार्यक्रमांसाठी खुली करण्याचा विचार आहे, असे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी सांगत मंत्री गावडे यांना क्लिनचीट दिली.

सरदेसाई म्हणाले, की कला अकादमी नूतनीकरण बांधकामाचा खर्च आता 49 कोटींवरून 66 कोटींवर पोहोचला आहे. टेकटॉन कंपनीला हे काम नामांकन तत्त्वावर देण्याचा निर्णय कला अकादमीचे अध्यक्ष तसेच कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनीच 15 मार्च 2021 रोजीच्या बैठकीत घेतला होता, हे कागदोपत्री स्पष्ट झाले आहे. आधीच हा भ्रष्टाचार झालेला असताना आता कला अकादमीच्या ध्वनी व व्यासपीठ प्रकाश यंत्रणेसह इतर कामांसाठी हल्लीच आणखी सुमारे 16.78 कोटींना प्रशासकीय मंजुरी देण्यात आल्याची माहिती पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना आमदार सरदेसाई यांनी दिली.

घोटाळ्याबाबत प्रश्‍न निर्माण

मंत्री गोविंद गावडे यांनी कला अकादमी नूतनीकरणाबाबत बांधकामाचा निर्णय हा राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता, असे वक्तव्य करून सरकारलाच जबाबदार धरले आहे. भाजपचेच काही नेते या घोटाळ्याबाबत प्रश्‍न उपस्थित करत आहेत. अकादमीचे मूळ बांधकाम हे 4 कोटींमध्ये झाले होते तर त्याच्या नूतनीकरणावर 49 कोटी खर्च केला जात असल्याने लोकांनाही त्याचे आश्‍चर्य वाटले. त्यामुळे सरकारने हा घोटाळा आता कुठे तरी थांबवावा व लगाम घालावा, अशी मागणी विजय सरदेसाई यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT