Goa Budget 2023-24  Gomantak Digital Team
गोवा

Goa Budget Session 2023 : पीएफआयच्या कारवायांवर सरकारची नजर; मुख्यमंत्र्यांची माहिती

आमदार आर्लेकर यांची लक्षवेधी सूचना

दैनिक गोमन्तक डिजिटल

मागील कालावधीत देशभर दहशतवादी कारवायांमध्ये नाव आलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) कारवायांवर राज्य सरकार नजर ठेवून आहे. आमदार प्रवीण आर्लेकर यांनी मांडलेल्या नुकत्याच झालेल्या विधानसभा अधिवेशनात लक्षवेधी सूचनेवर मुख्यमंत्र्यांनी हे उत्तर दिले.

आर्लेकर म्हणाले की, राज्यातील लोकांच्या मनात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कारवायांबाबत भीती व चिंता आहे. गोवा हे बंधुभाव आणि जातीय सामाजिक सलोख्यासाठी ओळखले जाते. अशा संघटना गोव्याच्या सामाजिक जडणघडणीला धोका निर्माण करत आहेत. यासंदर्भात सरकार काय पावले उचलू इच्छित आहे हे जाणून घेणे आवश्‍यक आहे.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, पीएफआयच्या कारवाया, या संघटनेचे सदस्य, समर्थक आणि राज्यातील आरोपींवर कडक नजर ठेवली जात आहे. आरोपी अल्ताफ हुसेन, अल्ताफ सय्यद आणि त्यांच्या 23 साथीदारांवरही कडक नजर ठेवली जात आहे.

तसेच या प्रकरणात ज्यांची कसून चौकशी झाली होती, त्यांच्यावर पाळत ठेवली जात आहे. तपासादरम्यान अल्ताफ सईद ‘वी फॉर फातोर्डा’ या राजकीय गटाला निधी देत ​​असल्याचे समोर आले आहे.

हैदराबाद पोलिसांनी अल्ताफ सईदविरुद्ध भादंसं कलम 287 आणि 347 नुसार गुन्हा दाखल केला असून तपास अद्याप सुरू अल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

32 कार्यकर्त्यांना अटक

भारत सरकारने बंदी लादल्यानंतर, सीआरपीसीच्या प्रतिबंधात्मक कलमाखाली तब्बल 32 कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. फातोर्डा, मायणा-कुडतरी, वास्को, वाळपई, फोंडा आणि मडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही अटक करण्यात आली.

संघटनेची सर्व कार्यालये सील करण्यात आली असून संघटनेशी संबंधित विविध कागदपत्रे संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आली आहेत. याशिवाय पीएफआयला मदत करणाऱ्या ‘ह्युमन वेल्फेअर ट्रस्ट’च्या कार्यालयाचीही झाडाझडती घेण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT