SOTY Shooting in Goa: ...तर गोव्याचाही 'उडता पंजाब' होईल! असं का म्हणाले विजय सरदेसाई

खरेतर गोव्यात फिल्मसिटी नाही, पण तरीही गोव्यातील आकर्षक पर्यटन स्थळांमुळे दिग्दर्शक त्यांचे चित्रपटांचे शुटींग गोव्यात करत असतात
Karan Johar | SOTY Shooting in Goa
Karan Johar | SOTY Shooting in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा हे देशी-विदेशी पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. फक्त पर्यटकच नव्हे तर सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार आणि दिग्दर्शक त्यांच्या सिनेमांचे चित्रीकरण करण्यासाठी गोव्यात येत असतात. आजवर अनेक मराठी-हिंदी चित्रपटांचे शुटींग गोव्यात झाले आहे.

सध्या अशी चर्चा सुरू आहे की, गोव्यात प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहर त्याच्या गाजलेल्या चित्रपटाचे म्हणजेच 'Student Of The Year' च्या तिसऱ्या भागाचे चित्रीकरण करणार आहे. मात्र यानंतर राजकीय वर्तुळात मत-मतांतरांंना सुरुवात झाली आहे.

Karan Johar | SOTY Shooting in Goa
Pomburpa: खोल विहीरीत पडली गाय, रस्सी लावून सुखरूप काढले बाहेर

खरेतर गोव्यात फिल्मसिटी नाही, पण तरीही गोव्यातील आकर्षक पर्यटन स्थळांमुळे दिग्दर्शक त्यांचे चित्रपटांचे शुटींग गोव्यात करत असतात. इथले असेच एक ठिकाण म्हणजे साखळी.

करण जोहर 'स्टुडंट ऑफ द इयर' भाग 3 साखळी कॉलेज आणि रवींद्र भवन परिसरात शूट करणार आहे. त्यामुळे साखळी हे एज्युकेशन हबप्रमाणेच चित्रपटांचेही ठिकाण बनेल, असे बोलले जात आहे.

....तर गोव्याचाही 'उडता पंजाब' होईल!

या चित्रीकरणावर विरोधकांनी आक्षेप व्यक्त केला आहे. फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई म्हणाले की, या सगळ्यामुळे 'उडता पंजाब'प्रमाणेच 'उडता गोवा' असे चित्र निर्माण होईल. तर विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी गोव्यातील या ठिकाणांचे पावित्र्य राखण्यासाठी या गोष्टी थांबल्या पाहिजे म्हणून मुख्यमंत्री सावंत यांना पत्र लिहिले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com