Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Mhadei River: 'म्हादई'साठी सरकार कार्यतत्पर, हरित गोव्याबाबत विशेष तरतूद; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

CM Pramod Sawant: मुख्यमंत्री म्हणाले, आपण सर्व माजी आमदारांनी सरकारला प्रशासन, कायदा, सुव्यवस्था तसेच इतर बाबतीत मार्गदर्शन करावे आपल्या सूचनांवर सरकार म्हणून योग्य ती कार्यवाही करू.

Sameer Panditrao

CM Pramod Sawant About Mhadei River

पणजी: राज्य सरकार सदोदित गोव्याला हरित ठेवण्यासाठी, स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यासाठी कराव्या लागणाऱ्या सुधारणा, आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. म्हादईसंदर्भातही सरकार कार्यतत्पर असून भविष्यातही राहू , असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. ते गोवा विधानसभेत आयोजित गोवा विधिकार दिन सोहळ्यात बोलत होते.

यावेळी सभापती रमेश तवडकर, विरोधीपक्षनेते युरी आलेमाव, माजी आमदार मोहन आमशेकर, व्हिक्टर गोन्साल्विस, सदानंद मळीक उपस्थित होते. दरम्यान मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, आपण सर्व माजी आमदारांनी सरकारला प्रशासन, कायदा, सुव्यवस्था तसेच इतर बाबतीत मार्गदर्शन करावे आपल्या सूचनांवर सरकार म्हणून योग्य ती कार्यवाही, पाठपुरावा करू असे आश्‍वासन त्यांनी यावेळी दिले.

माजी आमदारांचा सत्कार

१९८९ ते १९९४ दरम्यान आमदार म्हणून कार्यरत असणाऱ्या माजी आमदार व्हिक्टर गोन्साल्विस, डॉ. कार्नो पेगादो, धर्मा चोडणकर, विनयकुमार उसगावकर, फॅरल फुर्तादो, मोहन आमशेकर, डॉम्निक फर्नांडिस, राधाराव ग्रासियस यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arjun Tendulkar: नको तेच झालं! साखरपुड्यानंतर सचिनच्या लेकाला मोठा धक्का, नेमकं प्रकरण काय? वाचा..

Curchorem Accident: कुडचडे पोलीस ठाण्यासमोर अपघात, एकाच वेळी तीन गाड्या आणि दुचाकीची धडक; एकजण जखमी

Rohit Sharma: ‘देशाला तुझी अजून 5 वर्षे गरज...’, रोहित शर्माच्या निवृत्तीवर भारतीय दिग्गजाचं मोठं वक्तव्य

Goa Crime News: वास्कोत क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, बिहारचे तिघे अटकेत; लाखोंचा मुद्देमाल जप्त

एका वर्षात चौथा मृत्यू, झोपेतच विद्यार्थ्याचा गेला जीव; BITS Pilani कॅम्पसमधील घटनेने हळहळ

SCROLL FOR NEXT