CM pramod sawant Dainik Gomantak
गोवा

CM pramod Sawant: शिक्षक घडवितात भावी पिढी

मुख्यमंत्री सावंत : राजभवनावर शिक्षक पुरस्‍कारांचे वितरण

दैनिक गोमन्तक

Goa Teacher Award: शिक्षक हाच पुढची पिढी घडवितो. ग्रामीण भागातील मुलांचे भविष्य घडविण्याचे ज्ञान पालकांना नसते, त्यामुळे ते कामही शिक्षकच करीत असतो. दहावीनंतर कोणत्या शाखेत जायचे, याबाबतचे मार्गदर्शन त्यांच्याकडून मिळते.

दहावी आणि बारावीच्‍या परीक्षा या मुलांचे भविष्य घडविणाऱ्या दोन पायऱ्या आहेत. योग्य मार्गदर्शन लाभल्‍यास योग्य भविष्य घडविता येते, असे प्रतिपादन शिक्षणमंत्री तथा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

दोनापावला येथे राजभवनावरील दरबार हॉलमध्ये शिक्षण खात्याच्या वतीने आज मंगळवारी आयोजित केलेल्‍या शासकीय शिक्षकदिन कार्यक्रमात मुख्‍यमंत्री प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर, शिक्षण संचालक शैलेश झिंगडे, एनसीआरटीचे संचालक शंभू घाडी यांची उपस्थिती होती. ‘मुख्यमंत्री वशिष्ठ गुरू’ पुरस्कारांचे आठ शिक्षकांना वितरण करण्यात आले.

एससीईआरटी मजबूत करण्यासाठी आयआयसीएस तयारी दाखविली आहे. त्यासाठी प्रयोगशाळेची निर्मिती केली जाईल, असे लोलयेकर म्‍हणाले.

शिक्षकांनी ठेवावा विश्‍वव्यापी दृष्टिकोन

शिक्षकांसह सर्व घटकांनी योग्य भूमिका बजावली तर नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) २०२०ची अंमलबजावणी योग्य प्रकारे होणार आहे. एनईपी जेवढ्या योग्य पद्धतीने अंमलात आणली जाईल, तेव्हाच पुढील पिढी चांगली घडेल. डिजिटल शिक्षण आले असले तरी शिक्षक हा कायम राहील, हे लक्षात घ्यावे.

परंतु त्यांना वेळोवेळी आपली योग्यता सिद्ध करावी लागणार आहे. त्‍यासाठी शिक्षकांना जग पाहावे लागेल, विश्‍वव्यापी दृष्टिकोन ठेवावा लागेल, असा सल्ला शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर यांनी दिला.

दहावी आणि बारावीनंतर अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास शिक्षण देण्याची सुविधा राज्य सरकारने सुरू केली आहे. गोवा हे जगप्रसिद्ध पर्यटनस्‍थळ असल्याने आदारातिथ्य (हॉस्पिटॅलिटी) क्षेत्रात मोठ्या संधी आहेत. त्यामुळे औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) आदरातिथ्याविषयीचे कोर्स सुरू केलेले आहेत.

- डॉ. प्रमोद सावंत, शिक्षणमंत्री तथा मुख्‍यमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT