कोवळ्या मुला – मुलींच्या तस्करीचा डाव उधळला; गोव्याकडे येणाऱ्या 13 जणांची वास्को – द – गामा ट्रेनमधून सुटका

Human trafficking: पोलिसांनी मुलांची चौकशी केली असता त्यांना कुठे नेले जात आहे? याबाबत त्यांना काहीच कल्पना नसल्याचे निष्पण्ण झाले.
Child trafficking racket busted | Anti human trafficking Goa
Vasco da Gama train rescueDainik Gomantak
Published on
Updated on

झारखंड येथून गोव्यात अल्पवयीन मुला – मुलींच्या तस्करीचा प्रयत्न रेल्वे पोलिसांनी उधळला. पोलिसांनी या कारवाईत १३ जणांची सुटका केली असून, यात एका मुलीचा समावेश आहे. रांची रेल्वे स्थानकावर सोमवारी (१३ ऑक्टोबर) ही कारवाई करण्यात आली.

वास्को – द – गामा एक्सप्रेसमधून १३ मुला – मुलींची गोव्यात तस्करी केली जात होती. मुरी रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिस कर्मचारी डब्यात चढल्यानंतर त्याने मुलांवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. रांची येथे पोहोचल्यानंतर १३ जणांची सुटका करण्यात आली. सर्वजण १२ ते १७ वयोगटातील आहेत. जसीध रेल्वे स्थानकावरुन ते डब्यात बसले होते.

Child trafficking racket busted | Anti human trafficking Goa
Viral Post: एका रात्रीसाठी 60 हजार, ओला - उबेर नाही; पर्यटकांची गोव्याकडे पाठ व्हिएतनाम, थायलंडला पसंती? पोस्ट चर्चेत

पोलिसांनी मुलांची चौकशी केली असता त्यांना कुठे नेले जात आहे? याबाबत त्यांना काहीच कल्पना नसल्याचे निष्पण्ण झाले. फक्त गोव्यात दाखल व्हायचंय एवढंच त्यांना सांगण्यात आले होते. गोव्यात कामाची व्यवस्था केल्याचे त्यांना सांगण्यात आले होते, अशी माहिती पोलसांनी माध्यमांना दिली आहे. 

रेल्वे पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद करत तपासास सुरुवात केली आहे. मुलांना बाल कल्याण विभागाकडे सोपविण्यात आले आहे. तसेच, आणखी एका घटनेत अगरतळा येथे मुलांना तस्करीद्वारे पाठवले जात होते. रांची स्थानकावरील या ऑपरेशनमध्ये देखील पोलिसांनी तीन मुलांची सुटका केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com