Goa CM Dr. Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Bhutani Project: ..परवानगी कधी मिळाली हे तुम्हीच तपासा! 'भूतानी' वादावरुन मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

CM Pramod Sawant: सांकवाळ येथील भूतानी प्रकल्प झालेल्या डोंगरकापणीमुळे हा प्रकल्प वादात सापडला आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Bhutani Mega Housing Project At Sancoale

पणजी: राज्यात येऊ घातलेल्या ‘भूतानी’ प्रकल्पावरून राज्यात वादंग निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी, माझा या कंपनीशी मुळीच संबंध नाही. माझ्याकडील कोणत्याही खात्याकडून या प्रकल्पाला परवानगी दिलेली नाही, असे स्पष्टीकरण देत त्यांनी पत्रकारांनाच या प्रकल्पाचे भूरूपांतरण कधी झाले, कसे झाले शोधून काढावे, असा सल्ला दिला.

दक्षिण गोव्यातील सांकवाळ (Sancoale) येथे भूतानी प्रकल्प येऊ घातला आहे. त्यासाठी झालेल्या डोंगरकापणीमुळे हा प्रकल्प वादात सापडला आहे. त्याविरोधात बिगरसरकारी संघटनांनी आंदोलन छेडले आहे. कुजिरा येथे नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमस्थळी या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांचे वाहन अडविण्याचा प्रयत्न केला होता.

पाटो येथील कार्यक्रमासाठी विलंबाने पोहोचलेल्या मुख्यमंत्र्यांना पत्रकारांनी याबाबत विचारणा केली असता, त्यावर त्यांनी भूतानी कंपनीशी माझा अजिबात संबंध नाही. माझ्याकडील खात्याकडून या प्रकल्पाविषयी कोणतीही फाईल मंजूर झालेली नाही.

जो व्हिडिओ व्हायरल केला आहे, तो चुकीचा आहे. कुजिरा येथील कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रगीत संपल्यानंतर मी तत्काळ माझ्या गाडीत येऊन बसलो. माझ्यासाठी राष्ट्र प्रथम. राष्ट्रगीत सुरू असताना चालत येण्यासंदर्भात अपप्रचार होत आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सुनावले.

ते म्हणाले, कुजिरा येथील त्या कार्यक्रमाचा आणि सरकारचा काहीही संबंध नाही. शेवटच्या क्षणी मी कार्यक्रमास पाहुणा म्हणून गेलो. दुसरी बाब म्हणजे भूतानी इन्फ्रा कंपनीच्या मालकासोबतचे छायाचित्र जे व्हायरल झाले आहे, ते छायाचित्र वर्षभरापूर्वीचे आहे. मला अनेकजण येऊन भेटत असतात. माझ्या खात्याकडे कधीच भूतानीच्या प्रकल्पाची फाईल आलेली नाही. नको असलेल्या बाबी कोण बोलतो? जे कोण बोलत आहे, त्यांचा प्रथम इतिहास पाहावा. कोण कुठे आहे, ते सर्व कळेल.

परवानगी कधी मिळाली हे तुम्हीच तपासा!

कोणत्याही प्रकल्पासाठी भू-रूपांतरण, बांधकाम परवाना, सीआरझेड परवानगी लागते. या प्रकल्पासाठी त्या कधी मिळाल्या हे तुम्ही तपासा, मग कधी प्रकल्प सुरू झाला हे कळेल. चुकीचे काही घडले असेल तर ते मागे घेण्याबाबत त्यात काही प्रक्रिया आहेत. असे मुख्यमंत्री म्हणाले.

राज्यात येणारा प्रकल्प कायदेशीररित्या असेल तर ती बाब वेगळी आहे; पण या भूतानीचा आणि माझा कोणताही संबंध नाही. माझ्या खात्यातून तसेच माझ्या सहीने ही फाईल गेलेली नाही. मागील सरकारच्या काळात झाले असेल तर मी नाही म्हणू शकत नाही. मुख्यमंत्री म्हणून त्याला जबाबदार असलो, तरी माझा थेट त्या प्रकल्पाशी काहीही संबंध नाही.
- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Edberg Pereira Assault Video: पोलिसांनी लाथा घातल्या, मारहाण केली; परेरा मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज आले समोर, पाहा व्हिडिओ

Edberg Pereira Assault Case: एडबर्ग परेरा मारहाण प्रकरणी निलंबित PSI निलेश वळवईकरांवर गुन्हा दाखल; पुढील तपास सुरु

Sleep Problem: झोपण्यापूर्वीच्या 'या' चुका तुम्हाला बनवत आहेत आजारी! वेळीच व्हा सावध

Poseidon Nuclear Drone: हिरोशिमा बॉम्बपेक्षा 6600 पट शक्तिशाली, पुतिन यांनी जगाला दाखवलं अणुशक्तीवर चालणाऱ्या ड्रोनचं विनाशकारी रुप; अमेरिका-नाटो चिंतेत VIDEO

Watch Video: हाय सायबा!! डोक्यावर धो-धो पाऊस तरीही पालिका इमारतीच्या छतावर चढला कामगार; म्हापशातला गजब प्रकार Viral

SCROLL FOR NEXT