Pramod Sawant News Dainik Gomantak
गोवा

दक्षिण गोव्यात वर्षभरात वैद्यकीय महाविद्यालय उभारणार

मुख्यमंत्र्यांची घोषणा : भाजपतर्फे राज्यात गरीब कल्याण संमेलन

दैनिक गोमन्तक

पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनुसार प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय उभारण्यात येणार आहे. त्यानुसार येत्या वर्षभरात दक्षिण गोव्यात नवे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. पणजीतील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे उपस्थित होते. (Pramod Sawant News)

यावेळी प्रमोद सावंत म्हणाले, राज्यात केंद्र सरकारतर्फे साकारण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांचे काम येत्या वर्षभरात पूर्ण होईल. यापैकी 15 ऑगस्टपर्यंत मोपा विमानतळ कार्यान्वित करण्यात येईल, तर दोनापावल येथे वॉटर स्पोर्टस इन्स्टिट्युट या वर्षअखेरपर्यंत सुरू होईल. तसेच धारगळ येथे उभारण्यात येणारे आयुष मंत्रालयाचे पहिले संशोधन केंद्र आणि रुग्णालय येत्या जुलैपर्यंत जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध होईल. याबरोबरच राष्ट्रीय महामार्गावरील झुआरी पुलाचे कामही अंतिम टप्प्यात असून तेही लवकरच पूर्ण होईल. देशात डबल इंजिन सरकारचा फायदा गोव्याला होत असून केंद्र सरकारच्या अनेक योजना राज्यात लागू केल्या

आहेत.

यावेळी तानावडे म्हणाले, पक्षाच्या केंद्रीय समितीने जाहीर केल्यानुसार 1 ते 15 जूनपर्यंत सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण धोरणानुसार विविध उपक्रम आयोजित केले आहेत. 4 ते 15 जूनपर्यंत राज्यातील सर्व मतदारसंघांमध्ये गरीब कल्याण संमेलन आयोजित केले असून मुख्यमंत्री सावंत यांच्यासह केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, विविध खात्यांचे मंत्री या संमेलनाला उपस्थिती दर्शवून केंद्र आणि राज्य सरकारतर्फे केल्या जाणाऱ्या योजनांची माहिती देणार आहेत.

दोन लाख गरीब कुटुंबापर्यंत पोचणार

या संमेलनाच्या निमित्ताने प्रत्येक दिवशी पाच तास याप्रमाणे 75 तास काम करण्याची जबाबदारी मंत्री आणि महत्त्वाच्या नेत्यांवर सोपवण्यात आली आहे. यादरम्यान केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती देणाऱ्या दोन लाख पुस्तिका दोन लाख कुटुंबांपर्यंत पोचवण्यात येणार आहेत. प्रामुख्याने गरिबांचे राहणीमान उंचावण्यासाठी केंद्राचा प्रयत्न असून त्याला राज्य सरकारकडून पाठिंबा मिळेल, असे सदानंद शेट तानावडे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Matoli Vendors: माटोळी बाजारात 'सोपो'चा गोंधळ! जबरदस्‍तीने वसुली, विक्रेत्यांनी सरकारच्‍या नावाने मोडली बोटे

BJP Poster War: रुमडामळमध्‍ये 'पोस्टर वॉर', भाजपचे दोन गट भिडले! पोलिसांच्या हस्तक्षेपाने तणाव निवळला

Goa Politics: कामत, तवडकर बिनखात्याचेच; पाच दिवस उलटले, खाते वाटपास आणखी विलंब शक्य‍

Court Verdict: 4.52 कोटींच्या वीज घोटाळा प्रकरणी माविन गुदिन्हो दोषमुक्‍त, पर्रीकरांनी केले होते आरोप; तब्‍बल 27 वर्षानंतर निकाल

Rashi Bhavishya 26 August 2025: मनातील गोंधळ कमी होईल, महत्त्वाच्या कामांना गती मिळेल; वाचा तुमच्या राशीचं भविष्य

SCROLL FOR NEXT