CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

गोव्यात खाणबंदी काळात 163 कोटींची भरपाई

ट्रक चालकांसह खाणग्रस्त बेरोजगारांना मिळाला लाभ; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती

दैनिक गोमन्तक

पणजी : राज्यात खाणबंदीच्या काळात बेरोजगार झालेल्या 6999 खनिजवाहू ट्रक चालकांना 148 कोटी रुपयांची मदत दिली गेली. तसेच खाणग्रस्तमुळे बेरोजगार झालेल्या सुमारे 2000 कर्मचाऱ्यांना 15 कोटींची भरपाई देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज विधानसभेत आतारांकित प्रश्‍नावरील लेखी उत्तराद्वारे दिली आहे.

काँग्रेस आमदार दिगंबर कामत यांनी राज्यातील खाण व्यवसायासंदर्भात स्थितीची माहिती प्रश्‍नाद्वारे विचारली होती. ‘खाण व्यवसाय कायदेशीरपणे तसेच शाश्‍वत खाणी सुरू करण्यासाठी काही पावले उचलण्यात आली आहेत व यासंदर्भात महाधिवक्ता यांचा सल्ला घेण्यात आला आहे. तसेच खाणी सुरू न झाल्यास आर्थिक सहाय्य देण्याची योजना पुढे सुरू ठेवण्याचा सरकारचा विचार आहे का?’ याची माहिती मागितली होती.

खाणबंदीच्या काळात सरकारने या योजनेखाली 2013 ते 2018 या काळात ट्रकचालकांना तसेच बेरोजगार झालेल्या खाण कर्मचाऱ्यांना मदत दिली आहे. ट्रक चालकांना अधिकाधिक सुरुवातीला प्रतिवर्ष 1.44 लाखापर्यंत तर खाण कर्मचाऱ्यांनाही या काळात मदत देण्यात आली.

योजनेला मुदतवाढ देण्याचा प्रश्‍नच नाही

राज्य सरकारने खाणग्रस्तांसाठी मदतनिधी देण्यासाठी 2013 मध्ये योजना जाहीर केली होती. त्यामध्ये खनिजवाहू ट्रक चालक व खाणबंदीचा फटका बसलेल्या कर्मचाऱ्यांचा समावेश केला. योजनेतंर्गत मदतनिधीसाठी अर्ज केलेल्या सर्वांना भरपाई दिली आहे. खाणींचा लिलाव करून खाण व्यवसाय करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याने या योजनेला मुदतवाढ देण्याचा प्रश्‍न येत नाही असे मुख्यमंत्री सावंत यांनी दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pisurle: विद्यार्थ्यांनी फुलविली झेंडूची फुले, पिसुर्ले सरकारी विद्यालयात 'ग्रीन वॉरिअर इको' क्लबचा स्तुत्य उपक्रम

Horoscope: आजचा दिवस 'गोल्डन' ठरणार! मिथुन, कर्कसह 'या' 4 भाग्यवान राशींना करिअरमध्ये मोठे यश, वाचा तुमचे भविष्य

Goa Live News: कदंब बसच्या धडकेत 23 वर्षीय तरुणी ठार, एकजण जखमी; वेर्णा येथे झाला अपघात

Tilak Varma: आशिया कपमध्ये कमाल, आता तिलक वर्मा करणार कॅप्टन्सी! टीमची झाली घोषणा; पाहा संपूर्ण संघ

BJP Rath Yatra Goa: भाजपतर्फे 25 डिसेंबरपर्यंत रथयात्रा, पदयात्रा; मतदारसंघनिहाय मेळावे होणार, स्वदेशीचा नारा करणार बुलंद

SCROLL FOR NEXT