Goa Bench Of Bombay High Court | Goa Panchayat Election
Goa Bench Of Bombay High Court | Goa Panchayat ElectionDainik Gomantak

OBC Reservation : ओबीसी आरक्षण याचिकेवर आज सुनावणी

राज्यातील 186 पंचायत निवडणुकीसाठी अधिसूचित केलेल्या ओबीसी आरक्षणाचं भवितव्य आज ठरणार आहे.
Published on

पणजी : राज्यातील 186 पंचायत निवडणुकीसाठी अधिसूचित केलेल्या ओबीसी आरक्षणाचं भवितव्य आज ठरणार आहे. कारण आरक्षणाला आव्हान दिलेल्या सहा याचिकांवर आज बुधवारी 20 जुलैला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात सुनावणी होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार तिहेरी चाचणी न करताच हे आरक्षण केले गेले आहे. ज्या ठिकाणी ओबीसी नाहीत तेथे आरक्षण ठेवण्यात आले आहे, तर जेथे ओबीसी आहेत तेथे आरक्षण ठेवण्यात आले नाही असा घोळ करण्यात आला आहे. त्यामुळे आताची ओबीसी आरक्षणाची अधिसूचना रद्द करून पूर्वीचीच अधिसूचना या निवडणुकीसाठी लागू करण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाला द्यावा अशी विनंती याचिकादारांनी केली आहे.

Goa Bench Of Bombay High Court | Goa Panchayat Election
पंचायत निवडणूक लढवणाऱ्या कार्यकर्त्यांना ‘आरजी’चे समर्थन

निर्णयाकडे सर्वांचेच लक्ष

या निवडणुकीसंदर्भात इतर राज्यांत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निवाड्यांचा हवालाही खंडपीठासमोर सादर केले आहे. यामुळे याचिकांवर उच्च न्यायालय काय निर्णय देते याकडे उमेदवारांसह अनेकांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com