CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

Goa Mining : तर येत्या पाच महिन्यात खाणी सुरु करणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

लवकरच गोव्यात खाण उद्योग पुन्हा सुरु करण्याचे संकेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले आहेत.

आदित्य जोशी

पणजी : लवकरच गोव्यात खाण उद्योग पुन्हा सुरु करण्याचे संकेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले आहेत. खाण लिलाव येत्या 4 महिन्यात पूर्ण झाला तर 5 महिन्यात खाणी पुन्हा सुरु करणार अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मात्र या खाणींच्या लिलावादरम्यान एका मालकाला 10 किमी पेक्षा जास्तीचा परिसर घेता येणार नाही.

लिलावात स्थानिक कंपन्यांना प्राधान्य देण्याची मागणी फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी केली आहे. खाण अवलंबितांनी नुकतीच गोवा फॉरवर्डचे सर्वेसर्वा आणि फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांची भेट घेतली होती. यावेळी खाणप्रश्नी आवाज उठवणार असल्याचं ग्वाही सरदेसाईंनी अवलंबितांना दिली होती. आज विधानसभेत सरदेसाईंनी खाणप्रश्नी सरकारला थेट सवाल केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी खाणी सुरु करण्याचे सरकारचे प्रयत्न सुरु असून येत्या 5 ते 6 महिन्यात खाणी सुरु करणार असल्याची माहिती दिली.

विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजपकडून खाणी सुरु करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र विविध कारणांनी त्यात विघ्न येत होती.

दरम्यान ‘राज्य सरकारने खाणी बंद करण्याचा आदेश दिल्याने आमच्या कंपनीतील कामगारांना कामावरून काढून टाकण्याची परवानगी द्या’, अशी मागणी वेदांता सेसा कंपनीने केंद्र सरकारकडे केली होती. यासाठी तीन महिन्यांची नोटीस देण्यात आली असून ऑक्टोबरपर्यंत आपले सर्व कामकाज बंद करण्याचे संकेत वेदांताने याचिकेत दिले होते.

सरकारने आमची लिजेस बंद करून खाणीवरील सर्व सामग्री काढून घेण्याचा आदेश दिल्याने त्यामुळे नाईलाजाने हा निर्णय घ्यावा लागत आहे. आमची कंपनी ही कामगारांची हित पाहणारी असून गोव्यातील खाण व्यवसायावर काही तरी तोडगा निघेल अशी आमची आशा होती, असं कंपनीने म्हटलं होतं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT