Goa CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant : गोवा सरकार एक पाऊल मागे

शाळा विलिनीकरणाचा पेच : पालक, शिक्षकांशी चर्चेअंतीच निर्णय घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण

दैनिक गोमन्तक

CM Pramod Sawant : एकशिक्षकी सरकारी शाळांचे विलिनीकरण करण्याचा एकतर्फी निर्णय घेतल्यानंतर सरकारने आता एक पाऊल मागे घेत पालक, शिक्षकांशी समग्र चर्चा केल्यानंतरच अंतिम निर्णय घेण्याची भूमिका घेतली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सूतोवाच केले आहे. जुने गोवे येथे गुुरुवारी झालेल्या मुख्याध्यापक असोसिएशन समग्र शिक्षा यांच्यातर्फे राष्ट्रीय शिक्षण धोरणावर चर्चा करण्यासाठी आयोजित केलेल्या दोन दिवसीय शिक्षण परिषदेमध्ये मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष माधव खारवी, समन्वयक विलास सतरकर, म्हाळसाकांत देशपांडे आणि मान्यवर उपस्थित होते.

राज्यात शाळा बंद करण्याचा किंवा विलिनीकरणाचा कोणताच अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र, या शाळांमधील विद्यार्थ्यांचे भवितव्य लक्षात घेऊन सरकार विलिनीकरणाचा विचार करत आहे, असे डॉ. सावंत म्हणाले.

... मग गुणवत्तेमध्ये मागे का?

देशातील इतर राज्यांच्या तुलनेत राज्यातील शाळांना उत्तम साधनसुविधा दिल्या जातात. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत होतात. तुलनेने ते जास्तही आहेत. मग राष्ट्रीय सर्वेक्षणात महत्त्वाच्या गणित आणि विज्ञान विषयात राज्यातील विद्यार्थी सर्वांत मागे का? हा प्रश्‍न आहे. त्यामुळे शिक्षकांची गय नाही, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.

विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणही मातृभाषेतूनच मिळायला हवे!

प्राथमिक, माध्यमिकच नव्हे, तर व्यावसायिक शिक्षणही मातृभाषेतूनच मिळायला हवे. त्याचा विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी लाभ होत असल्याचे स्पष्ट झाल्याने आपल्या राज्यातीलही शिक्षण हे मातृभाषेतूनच व्हायला हवे, यासाठी सरकार आग्रही असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी सांगितले.

नव्या धोरणाची अंमलबजावणी

केंद्र सरकारने जुलै 2020 मध्ये लागू केलेल्या नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी देशभर सुरू झाली आहे. हा अभ्यासक्रम प्रचलित अभ्यासक्रमापेक्षा वेगळा असून तो गुणवत्ता आधारित आणि नाविन्याला प्रोत्साहन देणारा आहे. याकरता विद्यार्थी आणि पालकांनी सज्ज होण्याची गरज असल्याचे मत डॉ. सावंत यांनी व्यक्त केले.

नवीन अभ्यासक्रमाबाबत शाळा मागे

सध्या आपण गुणांना महत्त्व देऊन पदवीधरांची फौज तयार करत आहोत. शाळांनी शेजारील राज्यांमधील अभ्यासक्रमांचा आदर्श घेऊन नवनवे अभ्यासक्रम स्वीकारायला हवेत, ज्यामुळे कौशल्य विकास होऊन रोजगार निर्मितीसाठी फायदा होईल, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

COD Fraud: ‘कॅश ऑन डिलिव्हरी’ करताय? लागू शकतो चुना; मुरगावात भामट्यांची टोळी सक्रिय, 12 जणांची फसवणूक

Verca: 'शाळा का चुकवली'? पालक ओरडल्याने 2 विद्यार्थी गोव्यातून पळाले; पोलिसांच्या सतर्कतेमुळे सापडले भुसावळमध्ये

Hockey Asia Cup 2025 Final: टीम इंडियाने रचला इतिहास! चौथ्यांदा जिंकला 'आशिया कप', फायनलमध्ये कोरियाचा उडवला धुव्वा; पाकिस्तानलाही पछाडले

एअरलाईन्स कंपन्या गोव्याला सोडून इतर राज्यांना प्राधान्य देतायेत... सरकारच्या धोरणांचा राज्याचा पर्यटनाला फटका, आलेमाव यांचा आरोप

Goa Flood Relief: पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गोवा सरसावला! पंजाब आणि छत्तीसगडला आर्थिक मदतीची घोषणा; देणार प्रत्येकी 5 कोटी रुपये

SCROLL FOR NEXT