पणजी: मुख्यमंत्र्यांनी(CM Pramod Sawant) काल गोवा फॉरवर्डचे(GFP) अध्यक्ष, आमदार विजय सरदेसाई(Vijay SArdesai) यांना ‘रिकामटेकडे’ (बेकार) संबोधले. सरदेसाई यांनी इतर राज्यातील लोक गोव्यात येऊन लस घेतात. हे लसीकरण पर्यटन सरकार कसे चालवून घेते अशी विचारणा केली होती. याकडे मुख्यमंत्र्यांचे मंत्रिमंडळ बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेवेळी पत्रकारांनी लक्ष वेधले असता मुख्यमंत्री उसळून म्हणाले, विजय सरदेसाई सध्या रिकामेच आहेत. त्यांना कोणतेही काम नाही. त्यांचा राग अद्याप शमला नसेल. त्यांना खरे गोमंतकीयत्व म्हणजे काय हे मी दाखवून दिले आहे. आम्ही राज्यात सगळेच बंद केले असते, तर त्याला पहिला फटका औषध पुरवठ्याला बसला असता. ऑक्सिजनवाहू टॅंकर येणे बंद झाले असते. जीवनावश्यक वस्तू मिळेनाशा झाल्या असत्या. तांदूळ, डाळ, भाजी, चिकन सारे येणे बंद झाले असते. म्हणायला खूप सोपे असते, असेही ते म्हणाले.(CM Pramod Sawant criticized Goa Forward MLA Vijai Sardesai)
‘दुसऱ्यांना ‘बेकार’ म्हणणारे मुख्यमंत्री वैफल्यग्रस्त’
गोवा सरकारच्या जनविरोधी कृत्यावर प्रश्न विचारणाऱ्या विरोधी पक्षातील आमदाराला ‘बेकार’ म्हणणे यावरून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे वैफल्यग्रस्त झाल्याचे स्पष्ट होत असून कोरोना व्हायरसच्या गैरव्यवस्थापनावर मुख्यमंत्र्यांचा पर्दाफाश केल्यामुळे वैफल्यग्रस्त होऊन मुख्यमंत्री ही वक्तव्ये करीत आहेत. आपण सरकारला कोरोना व्हायरस नियंत्रणास आणण्यासाठी कृतीदल स्थापन करण्याची सूचना केली होती. या सुचनेवर सरकारने लक्ष केंद्रित करून आता सरकारने कृतीदल स्थापन करण्याचे जाहीर केले आहे. एकीकडे मुख्यमंत्री ‘बेकार’ असल्याचे वक्तव्य करीत आहेत, तर दुसरीकडे आपणच दिलेल्या सूचना मानून घेत आहेत, असे फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.