Goa CM Dr. Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Cash For Job Scam प्रकरणात कोणत्या राजकीय नेत्याचा सहभाग? तपासात हस्तक्षेप होतोय का? CM सावंतांनी दिली सगळी उत्तरे

CM Pramod Sawant On Finance Scam: राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, या प्रकरणाची उकल मीच करून दिली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

Cash For Job Scam

पणजी: राज्यात गाजणाऱ्या नोकऱ्यांच्या चोरबाजार प्रकरणांमध्ये पोलिस तपासात अद्याप कोणत्याही राजकारण्याचे नाव पुढे आलेले नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज पर्वरी येथे सांगितले. पोलिस तपास योग्य दिशेने सुरू आहे. त्यामुळे जनतेत विश्वास निर्माण झाला असून अनेक तक्रारदार पुढे येत आहेत, असा दावाही त्यांनी केला.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, या प्रकरणाची उकल मीच करून दिली होती. त्यानंतर तपासकामात कुठेही हस्तक्षेप केलेला नाही. पोलिस कारवाई करतात याविषयी विश्वास वाढल्याने लोक तक्रार देण्यासाठी पुढे येऊ लागले आहेत.

या प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे. सुरवातीला केवळ नोकरी देतो म्हणून पैसे घेऊन फसवणूक झाल्यापुरता हा घोटाळा मर्यादित होता. त्यानंतर बँकेत ठेवलेल्या कागदपत्रांत फेरफार, सदनिका देतो म्हणून पैसे घेऊन केलेली फसवणूक, बनावट प्रमाणपत्रांच्या बदल्यात घेतलेले पैसे, गुंतवणुकीसाठी पैसे घेऊन केलेली लुबाडणूक, रेल्वेची दुकाने मिळवून देतो म्हणून केलेली फसवणूक असे अनेक घोटाळे समोर आले आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

राज्यात उघडकीस येत असलेल्या फसवणूक व लुबाडणूक प्रकरणांच्या मुळाशी जाण्यासाठी पोलिसांना पूर्ण मोकळीक दिलेली आहे. अद्याप कोणत्याही राजकारण्याचे नाव समोर आलेले नाही. या प्रकरणातील शेवटच्या व्यक्तीला पकडेपर्यंत तपास थांबणार नाही.
डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

परिस्थितीजन्य पुरावे गोळा करण्यावर

एकंदरीत हे सारे सरकारी नोकरी देतो असे सांगून परस्पर पैसे हडप करणारे लोक आहेत असे दिसून येते. त्यांच्यावर न्यायालयीन माध्यमातून कारवाई व्हावी यासाठी परिस्थितीजन्य पुरावे पोलिस गोळा करत आहेत. बहुतांश व्यवहार रोखीने झाले असले तरी त्यासंदर्भातील पुरावे कसे गोळा करावेत हे पोलिसांना माहीत आहे.

ते योग्य कारवाई करतील. मुळात कारवाई केली जाते याविषयी जनतेत विश्वास निर्माण झाला आहे. भविष्यात असे प्रकार घडू नयेत यासाठी अशा प्रकरणांच्या मुळाशी जाऊन ही कीड कायमची ठेवण्याचे ठरविले आहे, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.

'फातोर्डा ते लंडन' प्रकरणाचा तपासही युद्धपातळीवर

फसवणुकीच्या प्रकरणांत गुंतलेल्या कोणालाही सोडले जाणार नाही. 'फातोर्डा ते लंडन' प्रकरणाचा तपासही शेवटची संबंधित व्यक्ती पकडली जाईपर्यंत बंद केला जाणार नाही. कुडचडे येथे एका महिलेने बँकेतील पैसे हडप केल्याप्रकरणी माहिती मिळाल्यावरून पोलिस तपास करण्यास तक्रारदारास पाठिंबा दिला.

संशयित गजाआड झाल्यानंतर आता अनेक तक्रारदार पुढे आले आहेत. असे घोटाळे आणि फसवणुकीचे प्रकार आणखी झालेले असतील आणि अद्याप तक्रार केली नसेल तर तक्रारदारांनी पुढे यावे, असे आवाहन मुख्यमंत्री सावंत यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT