Goa BJP News Dainik Gomantak
गोवा

Goa BJP: 'आगामी निवडणुकांसाठी सर्व मंडळांनी सज्ज राहावे'; सदस्य नोंदणी अपयशावरून तानावडेंनी केले सूचक विधान

Goa BJP Updates: भाजपचे संघटनपर्वात सर्वजण एकत्र आल्याचे चित्र असतानाच प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी मंत्री आलेक्स सिक्वेरा यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली.

Sameer Panditrao

पणजी: भाजपचे संघटनपर्वात सर्वजण एकत्र आल्याचे चित्र असतानाच प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी मंत्री आलेक्स सिक्वेरा यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली. यापूर्वीही लोकसभा निवडणुकीत सिक्वेरांकडून अपेक्षित कामगिरी झाली नव्हती, तसेच सिक्वेरा प्रतिनिधित्व करत असलेल्या नुवे मतदारसंघात ५० टक्केही सदस्यत्व नोंदणी न झाल्याने तेथे मंडळ अध्यक्षाची निवडणूक न घेता मंडळ अध्यक्ष नियुक्तीची नामुष्की भाजपवर ओढवली आहे.

मडकई, वेळी, नुवे आणि न्हावेली या चार मतदारसंघांमध्ये अद्याप ५०टक्के सदस्य नोंदणी झालेली नाही. मडकईत युती असूनही आम्हांला पक्ष भक्कम करणे, हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. सदस्य नोंदणीत अपयश आले तरी आगामी निवडणुकांसाठी सर्व मंडळांना सज्ज राहावे लागेल. मडकई आणि वेळी या दोन मतदारसंघात ५० टक्के सदस्य नोंदणी पूर्ण होणार आहे, असे तानावडे म्हणाले.

गोव्यातील भाजप सदस्य नोंदणी मोहीम अद्याप काही मतदारसंघांमध्ये ५० टक्क्याच्या खाली राहिली असून, याबाबत प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. विशेषतः नुवेममधील स्थितीवर चर्चा करताना तानावडे यांनी मंत्री आलेक्स सिक्वेरा यांच्या नेतृत्वाखाली नुवेमध्ये अपेक्षित सदस्यसंख्या गाठता आलेली नाही, असे जाहीर करून यावर त्यांनी विचार करण्याची गरज असल्याचे सांगितले आहे. भाजप मुख्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी मंत्र्यांवर सडेतोड भाष्य केले.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत, खासदार तथा भाजप मंडळ निवडणूक निरीक्षक अरुण सिंह आणि तानावडे यांच्या उपस्थितीत नवीन भाजप मंडळ अध्यक्षांचा पणजीत सत्कार करण्यात आला. पणजीत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत नवीनच झालेल्या भाजप मंडळ अध्यक्षांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, मतदारसंघ विजयासाठी मंडळ अध्यक्षांचे काम अत्यंत महत्त्वाचे असते. बूथ अध्यक्ष भक्कम असेल तरच मतदारसंघ जिंकता येतो. आमदार कार्यालय हे पक्षाचे कार्यकेंद्र मानले जाते आणि जर काही मतदारसंघात हे कार्यालय नसेल तर ते पुन्हा सक्रिय करण्यात मंडळ अध्यक्षांची भूमिका महत्त्वाची आहे.

युवा नेतृत्वाला संधी

तानावडे म्हणाले, नवीन मंडळ अध्यक्षांमध्ये बहुसंख्य युवा कार्यकर्त्यांचा समावेश आहे. वयोमर्यादा ठरवल्यामुळे जुने मंडळ अध्यक्ष काहीसे बाजूला राहिले असले, तरी बूथ अध्यक्ष म्हणून त्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. आगामी २०२७ च्या निवडणुकीत हेच बूथ आणि मंडळ अध्यक्ष पक्षासाठी विजय निश्चित करतील, असा विश्वास देखील तानावडे यांनी व्यक्त केला.

महिलांना संधी

प्रियोळ, कुडतरी, आणि फातोर्डा येथे महिलाची मंडळ अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. हा निर्णय पक्षाच्या महिला सक्षमीकरण धोरणाशी सुसंगत असल्याचे तानावडे यांनी नमूद केले.

जिल्हा अध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष

भाजपचे जिल्हाध्यक्ष निवडणुकीची प्रक्रिया १० जानेवारीला होणार असून ११ जानेवारीला निकाल जाहीर होतील. त्यानंतर प्रदेशाध्यक्षांची निवडणूक होणार असल्याचेही तानावडे यांनी सांगितले. भाजपने गोव्यात ४ लाखांहून अधिक सदस्य नोंदणी केली असली तरी काही मतदारसंघांतील अपयशावर चिंतनाची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. गोव्यात ४ लाखांहून अधिक सदस्य मोहीम पूर्ण केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shani Gochar 2026: शनीचे 'महागोचर'! 5 राशींच्या लोकांना बनवणार करोडपती आणि भाग्यवान; आयुष्यात येणार सुखाचे दिवस

Maharashtra ATF VAT Reduction: विमान प्रवाशांसाठी गुड न्यूज! फडणवीस सरकारनं घेतला मोठा निर्णय; विमान इंधनावरील 'व्हॅट' थेट 18 टक्क्यांवरुन 7 टक्क्यावर

PM Modi UAE Visit 2026: "होर्मुजची कोंडी फुटणे ही आमची प्राथमिकता'' पीएम मोदींचा युएईच्या भूमीवरुन जगाला शांततेचा संदेश

Viral Video: "मीच खरा मोगली" म्हणत पठ्ठ्याचा सापाशी पंगा, डंक मारताच हुसेन बोल्टसारखा सुस्साट; नेटकरी म्हणाले, 'एका झटक्यातच जिरली'

उघड्यावर कचरा टाकल्यास 5 हजारांचा दंड, नास्नोळा पंचायत मंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय; जागरूक नागरिकांना 10 हजारांचे बक्षीस

SCROLL FOR NEXT