BJP Mandal President: जल्लोष! भाजपच्या मंडळांवर नवे शिलेदार; अध्‍यक्ष निवडीचा आढावा

BJP Mandal President List: ‘भाजप’तर्फे सध्‍या अंतर्गत पातळीवर निवडणुका सुरू आहेत. चाळीसपैकी बहुतांश मंडळांचे अध्‍यक्ष जाहीर करण्‍यात आले आहेत.
BJP Mandal President List
Goa BJP UpdatesDainik Gomantak
Published on
Updated on

Goa BJP Mandal President List

पणजी: ‘भाजप’तर्फे सध्‍या अंतर्गत पातळीवर निवडणुका सुरू आहेत. चाळीसपैकी बहुतांश मंडळांचे अध्‍यक्ष जाहीर करण्‍यात आले आहेत. ही प्रक्रिया ७ जानेवारीपर्यंत पूर्ण होईल. ज्‍यांची निवड झाली, त्‍यात प्रामुख्‍याने आमदारांच्‍या पसंतीला स्‍थान दिसून आले. केडरचा हवा तसा विचार केला गेलेला नाही, अशी ओरडही ऐकू येत आहे. काही झाले तरी ‘उगवत्‍या सूर्याला नमस्‍कार’ हा रिवाज इथेही दिसला.

‘गटबाजी मुळीच नको, हेवेदावे बाजूला ठेवा’

भाजपच्‍या माध्‍यमातून देशात आणि गोव्‍यात मोठ्या प्रमाणात विकासकामे होत आहेत. त्‍याचबरोबर सर्वसामान्यांचे प्रश्‍नही सोडविले जात आहेत. पक्षाचे काम वाढीस लावण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने प्रयत्न करावेत, गटबाजी करू नये आणि सर्व कार्यकर्त्यांना समान वागणूक द्यावी, असे आवाहन फोंड्याचे आमदार तथा कृषीमंत्री रवी नाईक यांनी केले.

फोंडा भाजप मंडळ अध्यक्षपदी माजी सरपंच तथा भाजपचे कार्यकर्ते हरेश नाईक यांची निवड झाल्यानंतर रवी नाईक यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी ओबीसी आयोगाचे अध्यक्ष ॲड. मनोहर आडपईकर, भाजपचे पदाधिकारी देसाई, फोंडा नगराध्यक्ष आनंद नाईक, माजी अध्यक्ष विश्‍वनाथ दळवी, माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक रितेश नाईक उपस्थित होते. खडपाबांध-फोंडा येथे झालेल्या या कार्यक्रमाला भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. शांताराम कोलवेकर यांनी सूत्रसंचालन केले.

रवी नाईक यांचे समर्थक हरेश नाईक अध्‍यक्ष

नवनिर्वाचित अध्यक्ष हरेश नाईक हे कृषीमंत्री रवी नाईक यांचे समर्थक आहेत. कुर्टी-खांडेपार पंचायतीचे सरपंच म्हणून त्यांनी काम केले आहे. सध्या ते पंचसदस्य म्‍हणून कामगिरी बजावत आहेत. अनेक सामाजिक संस्था, संघटनांशी त्यांचा जवळचा संबंध आहे. रवी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आपण फोंड्यात भाजप मंडळाचे काम वाढीस लावणार असल्याचे त्‍यांनी सांगितले.

पेडणे भाजप गट मंडळाच्‍या अध्‍यक्षपदी सिद्धेश पेडणेकर

पेडणे मतदारसंघ भाजप गट मंडळ अध्यक्षपदी नगरसेवक सिद्धेश पेडणेकर यांची तर प्रतिनिधी म्‍हणून माजी जिल्हा पंचायत सदस्‍य सूर्यकांत तोरसकर यांची निवड झाल्‍याचे निरीक्षक तथा माजी आमदार दयानंद सोपटे यांनी जाहीर केले.

यावेळी आमदार प्रवीण आर्लेकर, मावळते अध्यक्ष तुळशीदास गावस, उपनगराध्यक्ष विशाखा गडेकर, उगवे-तांबोसे-मोपा सरपंच सुबोध महाले, तोर्से सरपंच छाया शेट्ये, वारखंड-नागझर सरपंच कविता कांबळी, कासारवर्णे सरपंच अवनी गाड, पेडणे युवा मोर्चा अध्यक्ष पांडुरंग नाईक, माजी जिल्हा पंचायत सदस्‍य रमेश सावळ, देवानंद गावडे उपस्थित होते.

प्रारंभी सुबोध महाले यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले. गौरी जोसलकर यांनी सूत्रसंचालन करून शेवटी आभार मानले.

भाजपने दिलेली जबाबदारी पार पाडण्‍यासाठी कटिबद्ध

एक सामान्य कार्यकर्ता ते भाजप मंडळ अध्यक्ष असा माझा आतापर्यंतचा प्रवास आहे. पक्षाने माझ्याकडे सोपविलेली जबाबदारी मी यथायोग्य पार पाडण्याचा प्रयत्न करेन, अशी ग्‍वाही शिवोली मतदारसंघ भाजप मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष मोहित चोपडेकर यांनी दिली.

आज रविवारी सकाळी मार्ना-शिवोली पंचायतीच्या सभागृहात याबाबत बैठक झाली. तीत चोपडेकर एकमताने निवड झाल्‍याचे जाहीर करण्‍यात आले. आता २०३० पर्यंत त्‍यांचा कार्यकाळ राहील.

यावेळी शिवोलीच्या आमदार दिलायला लोबो, उत्तर गोवा भाजपचे शंकर चोडणकर, माजी गटाध्यक्ष मोहन दाभाळे, नारायण मांद्रेकर, शिवोली जिल्‍हा पंचायत सदस्‍य सनिशा तोरस्कर, हणजूणच्या झेडपी निहारिका मांद्रेकर, मार्ना-शिवोली सरपंच संदेश हडफडकर, महिला मोर्चा अध्यक्ष लता परब, युवा अध्यक्ष विनय वायंगणकर व कार्यकर्ते उपस्‍थित होते.

भाजप हा सर्वसामान्‍यांचा पक्ष; सिद्धार्थ कुंकळ्येकर

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी डबल इंजीन सरकार असलेल्या केंद्राच्या मदतीने भरीव विकासकामे हाती घेतली आहेत. कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यामुळे आमचा पक्ष राज्य आणि देशासाठी काम करत आहे. आमचा पक्ष हा एकमेव पक्ष आहे जो केडर आधारित आहे, कुटुंबावर आधारित नाही किंवा इतर पक्षांप्रमाणे एकमेव व्यक्तीवर अवलंबून नाही. साध्या कार्यकर्त्याला पुढे जाण्याची संधी देणारा भाजप हा एकमेव पक्ष आहे, असे प्रतिपादन पक्षाचे ज्येष्ठ सदस्य आणि पणजीचे माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी केले.

कुंभारजुवा भाजप मंडळ अध्यक्षपदी तळागाळातील निष्ठावंत कार्यकर्ते व दिवाडी येथील रहिवासी योगेश पिळगावकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. जुने गोवे येथील पंचायत सभागृहात आज रविवारी यासंदर्भात झालेल्‍या बैठकीत कुंकळ्‍येकर बोलत होते.

यावेळी कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई उपस्‍थित होते. त्‍यांनी सांगितले की, धावजी येथील रेल्वे उड्डाणपुलाचे भूमिपूजन ११ जानेवारी रोजी होणार आहे. व्‍यासपीठावर विविध पंचायतींचे सरपंच, उपसरपंच, पंचसदस्य तसेच पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.

मोदींकडून कौतुकाची थाप

वाळपई मतदारसंघातील भाजप सदस्य संख्या सर्वाधिक आहे. या अभियानामुळे भाजपच्या कार्याला गती मिळाली आहे. ५० हजार सदस्य करण्‍याचे लक्ष्‍य गाठण्यात कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आणि त्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळाली, ज्यामुळे त्यांनी आमच्या कार्याचे कौतुक केले, असे आरोग्‍यमंत्री विश्‍‍वजीत राणे यांनी सांगितले.

वाळपई भाजप मंडळ अध्यक्षपदी रामा खरवत यांची बिनविरोध निवड झाल्‍यानंतर आयोजित कार्यक्रमात राणे बोलत होते. वाळपई आमदारांच्या कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला निवडणूक अधिकारी म्हणून आशिष शिरोडकर, वाळपई नगराध्यक्षा प्रसन्ना गावस, नगरगाव जिल्हा पंचायत सदस्य राजेश्री काळे, उसगाव जिल्हा पंचायत सदस्य रामनाथ गावडे, नगरसेवक, बूथ अध्यक्ष, सरपंच, पंच आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

खरवत हे नगरगाव, धावे-सत्तरी येथील रहिवासी असून सध्या ते नगरगाव पंचायतीचे उपसरपंच म्हणून कार्यरत आहेत. त्‍यांच्‍या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन करण्‍यात येत आहे.

BJP Mandal President List
Goa BJP: मंडळ अध्यक्ष निवडीत 'आमदारां'च्या मर्जीलाच झुकते माप; प्रदेशाध्यक्षपदासाठी 'तानावडें'साठी लॉबिंग?

सांगे भाजप मंडळ अध्यक्षपदी राजेश गावकर

सांगे भाजप मंडळ अध्यक्ष म्हणून राजेश गावकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मावळते अध्‍यक्ष बायो भंडारी यांच्या जागी त्‍यांची वर्णी लागली आहे.

सांगेचे आमदार तथा समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी याबाबत घोषणा केली. यावेळी बायो भंडारी, भाजप गोवा मंडळ सचिव सर्वानंद भगत, माजी आमदार वासुदेव मेंग गावकर, जिल्‍हा पंचायत सदस्‍य सुरेश केपेकर, सांगे मतदारसंघ प्रभारी गणपत नाईक, अध्यक्षा अर्चना गावकर, नगरसेवक, सरपंच, उपसरपंच तसेच भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्‍यान, राजेश गावकर यांचे अभिनंदन होत आहे.

BJP Mandal President List
Goa BJP State President: भाजप प्रदेशाध्यक्ष पदासाठी रस्सीखेच! सात जणांनी व्यक्त केली इच्छा; दिल्ली दरबारी होणार अंतिम फैसला

‘डबल इंजीन’ सरकारमुळे पर्येत वाहतेय विकासगंगा

पर्ये मतदारसंघाच्या विकासासाठी सर्वांचे सहकार्य लाभत असल्यामुळे आज अनेक प्रकल्प मार्गी लागले आहेत. तसेच भाजप सदस्यता मोहिमेत सर्वांनी चांगले सहकार्य करून मोठी आघाडी मिळविली आहे. भाजपच्या ‘डबल इंजीन’ सरकारमुळे आज सर्वत्र विकासगंगा वाहू लागली आहे, असे प्रतिपादन आमदार डॉ. दिव्या राणे यांनी केले.

पर्ये भाजप मंडळ अध्‍यक्षपदी श्रीपाद गावस यांची बिनविरोध निवड झाल्‍यानंतर राणे बोलत होत्‍या. त्‍यांच्‍या कार्यालयात झालेल्‍या या बैठकीला निवडणूक अधिकारी म्हणून विश्‍‍वास चोडणकर, होंडा जिल्हा पंचायत सदस्य सगुण वाडकर, केरी जिल्हा पंचायत सदस्य सगुण वाडकर, विनोद शिंदे, अशोक नाईक आदींची उपस्थिती होती.

श्रीपाद गावस हे शिरोली येथील रहिवासी असून स्थानिक पंचसदस्य आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com