CM Pramod Sawant:
CM Pramod Sawant: Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: राज्य सरकारकडून सणाची भेट; गॅस सिलिंडरचे 825 रूपये गणेश चतुर्थीपुर्वीच मिळणार

Akshay Nirmale

CM Pramod Sawant: केंद्र सरकारने नुकतेच गॅस सिलिंडरच्या दरात 200 रूपयांची कपात करत देशभरातील भगिनींना रक्षा बंधनाची भेट दिली होती. आता राज्यातील भाजप सरकारने देखील राज्यातील अनेकांसाठी गणेशोत्सवाची भेट दिली आहे.

गॅस सिलिंडरसाठीच्या अनुदानाचे 825 रूपये गणेश चतुर्थीपुर्वीच बँक खात्यात जमा केले जाणार आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीच ही माहिती दिली आहे. विविध सामाजिक योजनांतील थकीत रक्कम देखील लाभार्थ्यांना 15 सप्टेंबरपुर्वी दिली जाणार आहे. याशिवाय एएवाय रेशनकार्ड धारकांना अनुदानित दरात साखर मिळणार आहे.

अर्थात याचा लाभ केवळ अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांनाच मिळणार आहे. तरी देखील या लाभार्थ्यांची संख्या जवळपास 11,169 इतकी आहे. या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात गॅस सिलिंडरचे प्रत्येकी 825 रूपये थेट जमा होणार आहेत. त्यामुळे एकप्रकारे या लाभार्थ्यांना गणेशोत्सवाची भेट मिळाली आहे.

गणेशोत्सवाकडे चैतन्यसोहळा म्हणून पाहिले जाते. यंदा 19 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाची सुरवात होत आहे. तत्पुर्वीच गॅस सिलिंडरचसाठीचे हे पैसे बँक खात्यात जमा होतील.

मुख्यमंत्री म्हणाले की, जनधन अकाऊंट ओपन केलेल्यांना सरकारच्या सर्व योजनांचे लाभ मिळत आहेत. पेन्शन, रेशन, विधवांना मदत, इतर लाभ थेट खात्यात दिले जात आहेत. अजुनही कुणी जनधन खाते खुले केले नसतील तर लवकरात लवकर खुले करा.

गोव्यात अंदाजे 16 हजार जनधन खाती आहेत. राष्ट्रीयीकृती बँकेत हे खाते खुले केले जात आहे. आणि तेही एकही पैसा न घेता.

डीडीएसएसवाय आरोग्य कार्ड कुणाकडे याचीही यावेळी मुख्यमंत्र्यांनी विचारणा केली. त्या कार्डची किंमत अडीच लाख रूपये इतकी आहे. म्हणजेच त्यावर तुम्हाला अडीच लाखाचे उपचार होऊ शकतात. आजारी असताना ते कार्ड घेऊन सरकारी दवाखान्यात जायचे, किंवा खासगी दवाखान्यातही मोफत उपचार होऊ शकतात. असेही मुख्यमंत्र्यांनी महिलांना सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT