Sanquelim Municipal Council Election campaign  Dainik Gomantak
गोवा

Sanquelim Municipal Council Election 2023 : पत्नीकडे प्रचार सोपवून मुख्यमंत्री केरळला; राज्यपालांचे निमंत्रण

दहा प्रभागांची दहा निरीक्षकांवर जबाबदारी; दररोज पक्षश्रेष्ठींना अहवाल

दैनिक गोमन्तक डिजिटल

यापूर्वी विरोधकांच्या हाती राहिलेली साखळी पालिका कोणत्याही परिस्थितीत भाजपच्या निशाणाखाली आणण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कंबर कसली आहे. असे असले, तरी राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्या निमंत्रणावरून मुख्यमंत्री कन्येसह केरळमधील कार्यक्रमासाठी गेले आहेत. त्यामुळे सध्या प्रचाराची धुरा त्यांनी पत्नी सुलक्षणा सावंत यांच्यासह प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्यावर सोपवली आहे.

तानावडे यांच्यासह आता भाजपने उर्वरित दहा प्रभागांसाठी दहा निरीक्षक नेमले आहेत. यांच्यामार्फत दररोजचा अहवाल भाजपश्रेष्ठींकडे जातो. त्यानुसार दुसऱ्या दिवसाची प्रचाराची व्यूहरचना आखली जाते.

भाजपचे नवे डावपेच

भाजपने दहाही प्रभागांत निरीक्षक नेमले आहेत. त्यांनी रोजच्या प्रचाराचा अहवाल, इतर उमेदवारांचा वावर व इतर घडामोडींची इत्थंभूत माहिती प्रदेशाध्यक्षांना द्यायची आहे.

प्रभाग आठमध्ये प्रवीण ब्लेगन हे बिनविरोध निवडून आल्याने त्याठिकाणचा निरीक्षक भाजपने तत्काळ धर्मेश सगलानी यांच्या प्रभाग चारमध्ये हलविला आहे. त्याठिकाणी दोन निरीक्षकांचा दररोजचा अहवाल काय सांगतो, हे तपासून भाजप डावपेच आखत आहे.

‘टुगेदर फॉर साखळी’ वरचढ

‘टुगेदर फॉर साखळी’चा उमेदवार एखादा कार्यकर्ता सोबत घेऊन घरोघरी भेट देत आहे. त्या तुलनेत भाजपचा उमेदवार पंधरा-वीस जणांचा समूह घेऊन फिरत आहे. या निवडणुकीसाठी भाजपने आक्रमक प्रचाराची आखणी केली असली, तरी ‘टुगेदर’ने खरोखरच त्यांच्या नाकीनऊ आणल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT