Goa Forward Party : मुरगाव बंदरातील कोळसा हाताळणीत आणखी वाढ करणार नाही हे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिलेले आश्वासन फसवे असल्याचे आता सिद्ध झाले आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या बाबतीतही गोवेकरांचा विश्वासघात केला असा आरोप गोवा फॉरवर्डच्या पर्यावरण विभागाचे संयोजक विकास भगत यांनी केला आहे.
"मुरगाव बंदरातील एका बर्थवर पूर्वी 7.50 दशलक्ष टन कोळसा हाताळला जात होता त्या ठिकाणी आता 13 दशलक्ष टन कोळसा हाताळण्यासाठी केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने मंजूरी दिली आहे".
"त्या पार्श्वभूमीवर भगत यांनी टीका करताना नोव्हेंबर 2020 महिन्यात मुख्यमंत्री सावंत यांनी दोन वेळा या बंदरातील कोळसा हाताळणीत वाढ होणार नाही उलट हे प्रमाण कमी होणार असे सांगितले होते".
"त्याचे आता काय झाले असा प्रश्न करत या केंद्रातील इंजिन या स्थानीक डबल इंजिनला फारशी किंमत देत नाही आणि या स्थानीक इंजिनला फरफटत नेत आहे हे परत एकदा सिद्ध झाले आहे असा आरोप केला आहे".
या सरकारला गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई हे इव्हेंट मॅनेजमेंट सरकार असे म्हणत आहेत. हे सरकार फक्त इव्हेंट मॅनेजमेंट नाही तर कोळसा मॅनेजमेंट सरकारही आहे. कोळसा सम्राटाकडून या राजकारण्यांना बॅगा पोहोचल्या आहेत त्यामुळेच हे सरकार असले निर्णय घेत आहे असा आरोप भगत यानी केला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.