Goa Congress Press Conference
Goa Congress Press Conference Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: स्मार्ट सिटी कामाच्या घोटाळ्यात मुख्यमंत्री, मुख्य सचिव, आयुक्त दोषी... काँग्रेसचा आरोप

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Congress on Smart City Work: ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पातील भ्रष्टाचाराची व्याप्ती खूप मोठी आहे, त्यामुळे केंद्रीय शहरी व्यवहार मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांचा पर्दाफाश करण्याची हिंमत दाखवावी. त्यांची चौकशी करावी, अशी काँग्रेस नेते एल्विस गोम्स यांनी केली. काँग्रेस हाऊस येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मुख्यमंत्री, नगरविकास मंत्री, सचिव, आयुक्त हे सर्व दोषी आहेत. ते मुख्य आरोपी आहेत. त्यामुळे त्यांची चौकशी करण्याचे धाडस भाजप करणार नाही.

या वेळी जीपीसीसी मीडिया विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर, सरचिटणीस विजय भिके आणि पणजी महिला गटाध्यक्षा लविनिया डिकॉस्ता उपस्थित होते.

गोम्स म्हणाले की, भ्रष्टाचार सिद्ध करण्यासाठी भाजप सरकारने आपली हिंमत दाखवावी. पुरी यांनी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोचा वापर करून आमच्यावर आरोप केले.

प्रत्यक्षात पणजीतील लोकांना भेटून स्मार्ट सिटीच्या निकृष्ट कामामुळे कसा त्रास होतो हे जाणून घेण्यात ते अपयशी ठरले. फक्त न्यायालयीन तपासच या घोटाळ्याची तीव्रता उघड करू शकेल. जर भाजपचे नेते या भ्रष्टाचाराचे वाटेकरी नसतील तर ते चौकशीचे आदेश देण्यास का टाळाटाळ करत आहेत?

केंद्रीय दक्षता आयोगाला आदेश द्यावा आणि या भ्रष्टाचाराची चौकशी करावी. पणजीचे भाजप आमदार आणि महसूल मंत्री बाबुश मोन्सेरात यांनी पणजी 'स्मार्ट सिटी'चे सुरू असलेले काम दर्जाहीन असल्याचे मान्य केले असताना, आमचे आरोप फेटाळून आमच्यावर टीका करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह नगरविकास मंत्री, नगरविकास सचिव, मुख्य सचिव, महापालिकेचे आयुक्त, स्मार्ट सिटीचे अधिकारी हे सर्व दोषी आहेत. ते मुख्य आरोपी आहेत. त्यामुळे त्यांची चौकशी करण्याचे धाडस भाजप करणार नाही.

बाबुश यांनी बरोबरच म्हटले आहे की, सल्लागाराला 8 कोटी रुपये विनाकारण दिले जातात. जेव्हा मंत्री भ्रष्टाचार कबूल करतात, तेव्हा भ्रष्टाचाराचे पुरावे देण्याची गरजच नाही,’’ असे गोम्स म्हणाले.

पणजीकर म्हणाले की, पुरी यांना शहरात पदयात्रा करायला सांगितले होते. पण तसे न करताच ते दिल्लीला पळून गेले. निकृष्ट कामाचा फायदा कोणाला होईल हे आम्हाला माहीत आहे. स्मार्ट सिटीच्या कामाचा पर्दाफाश प्रसारमाध्यमांनी केला आहे.

पुरी यांना मंत्रिमंडळातून काढले पाहिजे. ते पुन्हा येथे आल्यास त्यांना काळे झेंडे दाखवणार.”

भिके म्हणाले की, सध्या स्मार्ट कमिशनचा पर्दाफाश होत आहे. स्थानिक आमदारानेही याचा पर्दाफाश केला आहे. आमचे आरोप बिनबुडाचे असेल तर खुल्या चर्चेसाठी या. या भ्रष्टाचारात केंद्राचादेखील हात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco Extortion Case: खंडणीसाठी वास्कोच्या व्यावसायिकाचे अपहरण करणाऱ्या आरोपीला जन्मठेप

Goa Human Trafficking: गोव्यात कशी होते मानवी तस्करी, कोणती आमिष दिली जातात? डिजीपींनी दिली माहिती

Panaji PS Attack Case: पणजी पोलीस स्थानक हल्ला प्रकरणाची 17 जूनला सुनावणी

Goa Politics: लोकांचा भाजपविरोधातील राग व्यक्त, दोन्ही जागा जिंकण्याचा इंडिया आघाडी दावा

Yellow Alert In Goa: गोव्यात पुढील सहा दिवस पावसाची शक्यता, दोन दिवसांसाठी 'यलो अलर्ट'

SCROLL FOR NEXT