Mauvin Godinho: परिवहन मंत्र्यांकडून 10 स्पीड पोर्टेबल रडार गन ट्रॅफिक विभागाककडे सुपूर्द

उद्या पासून वाहतुकीच्या नियमांची कडक अंमलबजावणी
Mauvin Godinho
Mauvin GodinhoDainik Gomantak

Mauvin Godinho: परिवहन मंत्री माविन गुदिन्हो यांच्या हस्ते 10 पोर्टेबल स्पीड रडार गन ट्रॅफिक विभागाकडे सुपूर्द करण्यात आल्या. पर्वरीत मंत्रालयाच्या सेमिनार हॉलमध्ये हा कार्यक्रम पार पडला.

या गनचा वापर उद्या, अर्थात 1 जूनपासून राज्यात राबविण्यात येणाऱ्या वाहतुकीच्या नियमांच्या कडक अंमलबजावणीसाठी करण्यात येणार आहे. एखाद्या वाहनाचे स्पीड ओळखण्यासाठी या गनचा वापर केला जातो. त्यातून वाहनाने वेगमर्यादा ओलांडली आहे की नाही, ते कळून येते.

Mauvin Godinho
अल्पवयीन मुलीचे अपहरण करून गोव्यात केला बलात्कार, तीन मुलींचा बाप अखेर पोलिसांच्या जाळ्यात

या वेळी परिवहन सचिव सुभाष चंद्रा, वाहतूक संचालक राजन सातार्डेकर, वाहतूक पोलिस अधीक्षख धर्मेश आंगळे, उत्तर गोवा वाहतूक पोलिस अधीक्षक सुदेश नार्वेकर, वाहतूक पोलिस उपाधीक्षक सुदेश नार्वेकर, दक्षिण मडगवाचे अतिरिक्त वाहतूक संचालक प्रल्हाद देसाई, पोलिस आणि वाहतूक विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

राज्यात पणजी शहर व आजूबाजूच्या परिसरात 1 जूनपासून 13 ठिकाणी बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होणार आहे. कारवाईचे चलन त्यांच्या व्हॉट्स ॲप क्रमांक किंवा घरच्या पत्त्यावर पाठवले जाणार आहे.

Mauvin Godinho
Goa Mining: खनिज वाहतुकीवरून दोन गटात वाद; कुडचडे येथे ट्रक अडविले

पणजीतील वाहतूक सिग्नलच्या ठिकाणी अत्याधुनिक वाहतूक व्यवस्थापन पद्धत (आयटीएमएस) बसविली आहे.

या सिस्टीममध्ये वाहनचालकाने सिग्नल तोडल्यास, हेल्मेट नसल्यास, सीटबेल्ट लावला नसल्यास, ओव्हर स्पिडिंग, दुचाकीवर दोनपेक्षा अधिकजण स्वार, ओव्हरटेकिंग केल्यास याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून चित्रीकरण होणार आहे.

जो कोणी वाहतूक नियमांचे उल्लंघन करील, त्याचा वाहन क्रमांक टिपण्याचेही काम ही यंत्रणा करणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com