Goa State Film Festival 2025 Dainik Gomantak
गोवा

Goa Film Festival: 'कोकणीतून चित्रपट निर्मितीसाठी पुढे या'! CM सावंतांचे आवाहन; राज्य चित्रपट महोत्सवाचा थाटात समारोप

Goa State Film Festival: . आत्तापर्यंत निर्माण झालेल्‍या कोकणी चित्रपटांचे संवर्धन केले जाईल, असे मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा राज्य चित्रपट महोत्सवाचा समारोप समारंभात सांगितले.

Sameer Panditrao

Goa film festival award winners: चित्रपट निर्मिती अनुदानातील ‘ब’ श्रेणीतील चित्रपटांसाठी ३० लाख आणि ‘क’ श्रेणीतील चित्रपटांना १० लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे. आत्तापर्यंत निर्माण झालेल्‍या कोकणी चित्रपटांचे संवर्धन केले जाईल, असे मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा राज्य चित्रपट महोत्सवाचा समारोप समारंभात सांगितले.

गोवा मुक्तीची १०० वर्षे पूर्ण झाल्यानंतरही जुने चित्रपट पहायाला मिळावेत यासाठी प्रयत्‍न केले जातील. कोकणी चित्रपट हा केवळ १५ लाख लोकांसाठी मर्यादित राहिला नाही तर कर्नाटक व महाराष्ट्रातील असे दोन कोटी लोक कोकणीप्रेमी आहेत. हा प्रेक्षकवर्ग लक्षात घेऊन कोकणी चित्रपट निर्मितीसाठी हवी ती मदत सरकारच्या वतीने मिळेल.

कोकणीतून चित्रपट निर्मितीसाठी पुढे या, असे आवाहन मुख्‍यमंत्र्यांनी केले. राज्यात इफ्फी, मराठी चित्रपट महोत्सव आणि राज्य चित्रपट महोत्सव होतो, ही अभिमानाची बाब असल्‍याचेही त्‍यांनी नमूद केले.

कला अकादमीत रविवारी सायंकाळी झालेल्‍या या समारोप सोहळ्‍याला भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, गोवा मनोरंजन सोसायटीच्या उपाध्यक्षा आमदार दिलायला लोबो आणि मान्यवर उपस्थित होते.

या महोत्सवात दहावा, अकरावा आणि बारावा असे चित्रपट महोत्सवांचा समावेश होता. त्यामुळे दहाव्या (१ जानेवारी २०१८ ते ३१ डिसेंबर २०१९ दरम्यान निर्मिती झालेले) महोत्सवात ‘जुझे’ चित्रपटाने बाजी मारली.

दुसरा क्रमांक काजरो, तर उत्कृष्ट चित्रीकरणासाठी मिरांशा नाईक (जुझे) यांना बक्षीस मिळाले. इतर बक्षिसे अशी : उत्कृष्ट दिग्दर्शन दुसरे स्वप्नील शेटकर (कॉस्तांव दि कुपुसांव), उत्कृष्ट अभिनेता ऋषिकेश नाईक (जुजे), उत्कृष्ट अभिनेत्री ज्योती बागकर (काजरो), उत्कृष्ट साहाय्‍यक अभिनेता सुदेश भिसे (जुझे), उत्कृष्ट साहाय्‍यक अभिनेत्री प्रशांती तळपणकर (जुझे), उत्कृष्ट बाल कलाकार चैतन्य नाईक (कॉस्तांव दी कुपुसांव), उत्कृष्ट स्क्रिनप्ले मिरांशा नाईक (जुझे), उत्कृष्ट संवाद मिरांशा नाईक (जुझे), उत्कृष्ट गीते साईश पाणंदीकर (आमीजादे), उत्कृष्ट कला दिग्दर्शन रोहन नाईक (कॉस्तांव दी कुपुसांव), उत्कृष्ट गायक ऑर्बिला रॉड्रिग्स (ग्लोरी), उत्कृष्ट गायिका प्रियांका रायकर (कॉस्तांव दी कुपुसांव), उत्कृष्ट सिनेमेटोग्राफी सूरज कुराडे (मिरांडा हाऊस), उत्कृष्ट एडिटर सिद्धेश नाईक (जुझे), उत्कृष्ट कला दिग्दर्शक सतीश गावकर (कॉस्तांव दी कुपुसांव), उत्कृष्ट वेशभूषा अभय जोग (काजरो).

विशेष ज्युरी पुरस्कार : उत्कृष्ट दिग्दर्शन नितीन भास्कर (काजरो), उत्कृष्ट कलाकार विठ्ठल काळे (काजरो), उत्कृष्ट अभिनेत्री बरखा नाईक (जुझे), उत्कृष्ट सहायक अभिनेत्री गौरी कामत (कॉस्तांव दी कुपुसांव), उत्कृष्ट कला दिग्दर्शक रितेश राजन-श्रीधर चोगालिंगम, उत्कृष्ट पार्श्वगायक चिन्मय श्रीपाद (आमीजादे), उत्कृष्ट सिनेमेटोग्राफी अभिराज रावाळे (जुझे) व एस. समीर (काजरो), उत्कृष्ट एडीटर सुझाना पेद्रो, (जुझे), उत्कृष्ट ऑडियोग्राफी थॉमस रॉबर्ट (जुझे), उत्कृष्ट कला दिग्दर्शक प्रणिता पळ-रवी शाह (जुझे), उत्कृष्ट वेशभूषा निलंचल घोष (जुझे).

अकराव्या महोत्सवातील विजेते : उत्कृष्ट चित्रपट रानसावट, उत्कृष्ट दिग्दर्शक जयेंद्रनाथ हळदणकर, उत्कृष्ट कलाकार विशाल गावस (रानसावट), उत्कृष्ट अभिनेत्री सुमन फर्नांडिस (पेद्रू पदेर), उत्कृष्ट साहाय्‍यक अभिनेत्री मीना घोष (डिकॉस्‍टा हाऊस), उत्कृष्ट कथा गुरुदास नाटेकर (रानसावट), उत्कृष्ट स्क्रिनप्ले जितेंद्र सिकेरकर (डिकॉस्‍टा हाऊस),

उत्कृष्ट संवाद जोसेफ फ्रान्सिस डिसोझा व ख्रिस्ट संजो सिल्वा (पेद्रू पदेर), उत्कृष्ट संगीत दिग्दर्शन व उत्कृष्ट गायक एलिक वाझ (पेद्रू पदेर), उत्कृष्ट पार्श्वगायिका अक्षदा तळावलीकर (रानसावट), उत्कृष्ट सिनेमेटोग्राफी पॅटसन बार्बोझा (डिकॉस्‍टा हाऊस), उत्कृष्ट एडिटर सपना नाईक (पेद्रू पदेर), उत्कृष्ट ऑटोबायग्राफी रोहित गवंडी (रानसावट), उत्कृष्ट कला दिग्दर्शनक अंकिता डिसोझा (पेद्रू पदेर), उत्कृष्ट वेशभूषा रश्मी हळदणकर (रानसावट). विशेष ज्युरी पुरस्कार : उत्कृष्ट गीते एलिक वाझ (पेद्रू पदेर), उत्कृष्ट सिनेमेटोग्राफी अश्विन चिदे, उत्कृष्ट ऑडियोग्राफी भावेश फुलारी आणि उत्कृष्ट एडिटिंग गोपाल सॉलटेक (कुपामचो दरयो). नॉन फिचर फिल्म : उत्कृष्ट चित्रपट कुपामचो दरयो, उत्कृष्ट संगीत दिग्दर्शन दौलत पालयेकर व उत्कृष्ट थिम (कुपामचो दरयो).

बाराव्या महोत्सवातील विजेते : उत्कृष्ट चित्रपट प्रथम मोग, दुसरे पारितोषिक क्रेझी मोगी, उत्कृष्ट दिग्दर्शक ख्रिस्ट सिल्वा (क्रेझी मोगी), उत्कृष्ट अभिनेता अनिकेत मडकईकर, उत्कृष्ट अभिनेत्री समांता दा कॉस्ता, उत्कृष्ट साहाय्‍यक अभिनेता जॉन डिसिल्वा, उत्कृष्ट साहाय्‍यक अभिनेत्री शेफाली नाईक, उत्कृष्ट कथा ख्रिस्ट सिल्वा, उत्कृष्ट संवाद व उत्कृष्ट स्क्रिनप्ले ख्रिस्ट सिल्वा (क्रेझी मोगी), उत्कृष्ट गीते व उत्कृष्ट कला दिग्दर्शन एलिसन गोन्साल्विस (क्रेझी मोगी), उत्कृष्ट पार्श्वगायक राजेश मडगावकर (मोग), उत्कृष्ट पार्श्वगायिका

सोनिया सिरसाट (मोग), उत्कृष्ट सिनेमेटोग्राफी जोसफर्न डिसोझा (क्रेझी मोगी), उत्कृष्ट एडिटर ख्रिस्ट सिल्वा (क्रेझी मोगी), उत्कृष्ट ऑडियोग्राफी तरन डिसोझा (मोग), उत्कृष्ट कलादिग्दर्शक जोसेफ वर्गीस-जेसन फर्नांडिस (क्रेझी मोगी), उत्कृष्ट वेशभूषा अलिशा साळकर (फटिंग नं. १), विशेष ज्युरी पुरस्कार : उत्कृष्ट दिग्दर्शक नीलेश माळकर (मोग), उत्कृष्ट अभिनेता मनोज जोशी (मोग), उत्कृष्ट अभिनेत्री नश्रत्रा मेढेकर (मोग), उत्कृष्ट कला दिग्दर्शन डॅनिस वल्लभन (मोग).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2025: राजस्थानची 'रॉयल' रणनीती! मिनी लिलावापूर्वी घेतला मोठा निर्णय, 'या' अनुभवी खेळाडूला केलं प्रशिक्षक

Cooch Behar Trophy: ..गोव्याने पकड गमावली! 5 बाद 27 वरुन छत्तीसगडच्या 170 धावा; फलंदाजांची खराब सुरवात

Chess World Cup Goa: विश्वकरंडक बुद्धिबळात भारताची आशा आता अर्जुनवर, हरिकृष्णाचे आव्हान टायब्रेक फेरीतील पराभवाने संपले

Unwritten Horizon: ..आपला गोवा काय होता आणि काय बाकी राहिला आहे, हे सांगणारे प्रदर्शन ‘अनरिटन होरायझन’

IFFI 2025: आयसीएफटी युनेस्को गांधीपदक स्पर्धेतील चित्रपट कोणते? पहा लिस्ट..

SCROLL FOR NEXT