Goa State Film Festival: सिनेमा, कलेसाठी सरकारचे सातत्याने योगदान! CM सावंतांचे प्रतिपादन; राज्य चित्रपट महोत्सवाचे उद्‍घाटन

Goa State Film Festival Inaugration: रखडून असलेल्या चित्रपट महोत्सवाचे १०वा ११वा आणि १२वा अशा तीन चित्रपट महोत्सवाचे एकत्रित करून पणजी येथील आयनॉक्स सिनेमागृहात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.
Goa Film Festival
Goa Film Festival Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्यात सिनेमा आणि सादरीकरण कलेसाठी सरकारचे सातत्यपूर्ण योगदान आहे, असे विधान गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी गोवा राज्य चित्रपट महोत्सवाच्या उद्‍घाटन प्रसंगी केले.

शाळेत शिकवले जाणारे सादरीकरण कलासंबंधी विषय, नाट्य महाविद्यालय, गोव्यात होणारे वेगवेगळे चित्रपट महोत्सव, त्या अनुषंगाने होणाऱ्या कार्यशाळा यातून गोव्यातील चित्रपट कलाकारांसाठी पोषक असलेली वातावरण निर्मिती होते, असे ते पुढे म्हणाले. गेली अनेक वर्षे रखडून असलेल्या चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन १०वा ११वा आणि १२वा अशा तीन चित्रपट महोत्सवाचे एकत्रित करून पणजी येथील आयनॉक्स सिनेमागृहात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.

या चित्रपट महोत्सवाला प्रसिद्ध दक्षिणात्य विनोदी नाट्य अभिनेते मोहम्मद अली हजर होते. भारतातील सुमारे पाच भाषांमधील चित्रपटात काम करणाऱ्या या अभिनेत्याने, चित्रपट कलाकारासाठी भाषा ही महत्त्वाची नसून ‘सिनेमा’ हे माध्यम भाषेपलीकडे जाते हा आपला अनुभव आहे, असे सांगितले. गोवा मनोरंजन संस्थेच्या उपाध्यक्षा दिलायला लोबो यांनीही संस्थेतर्फे वर्षभर होणाऱ्या कार्यक्रमांचा उल्लेख आपल्या भाषणात केला.

कार्यक्रमासाठी रोचक रचना

आजच्या राज्य चित्रपट महोत्सवाच्या उद्‍घाटनपर कार्यक्रमासाठी रोचक अशी रचना चित्रपट दिग्दर्शक स्वप्निल शेटकर आणि त्याच्या टीमने केली होती. आगळ्यावेगळ्या तऱ्हेने या कार्यक्रमाचा प्रवाह चालेल, अशी योजना जरी त्यात केली गेली होती, तरी शेवटी तो सरकारी कार्यक्रम असल्या कारणाने शेवटच्या मिनिटाला होणाऱ्या हस्तक्षेपातून अशा अनोख्या रचनेच्या सादरीकरणात देखील, कसा विरस होऊ शकतो याचे प्रत्यंतरही अधेमधे येत होते.

Goa Film Festival
Goa Film Festival 2025: 'आई जेवू घालीना, बाप भीक मागू देईना' गोव्यातील सिनेकर्म्यांची अवस्था

‘फूल आनी सावली’ची बाजी

४८ तासांत लघु चित्रपट तयार करण्याच्या स्पर्धेचा निकाल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घोषित केला. या स्पर्धेचे विजेते पुढील प्रमाणे, उत्कृष्ट चित्रपट पहिले बक्षीस - फूल आनी सावली (फ्लॉवर अँड शेड), द्वितीय बक्षीस - बिफोर सनराईज. उत्कृष्ट दिग्दर्शक - ग्लेन कार्दोज (फूल आनी सावली). उत्कृष्ट सिनेमेटोग्राफर - तेजस व्ही. नाईक (फूल आनी सावली). उत्कृष्ट संपादक - युरी बी. कार्व्हाल्हो (फूल आनी सावली). उत्कृष्ट अभिनेता - नीरज ॲरी (लिफ्ट). उत्कृष्ट अभिनेत्री - रती भाटीकर (फूल आनी सावली)

Goa Film Festival
Goa State Film Festival: वर्षा उसगावकर यांना 'जीवनगौरव पुरस्कार', राज्य चित्रपट महोत्सवाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार शुभारंभ

कर्मचारी आणि अधिकारी

गेल्या अनेक वर्षानंतर गोवा राज्य चित्रपट महोत्सव आयोजित होत असला तरी आयनॉक्सचे सिनेमागृह अर्धेच भरलेले होते. मंचाच्या दोन्ही बाजूंना मात्र कर्मचारी आणि अधिकारी यांची गर्दी दाटलेली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com