Crowded in the market to buy monsoon materials
Crowded in the market to buy monsoon materials Gomantak Digital Team
गोवा

Panaji : शालेय, पावसाळी साहित्य खरेदीची बाजारात लगबग

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी : मॉन्सून काही दिवसांवर येऊन ठेपल्याने तसेच शाळा सुरू होण्यास देखील काही दिवसच राहिल्याने राज्यात पावसाळी तसेच शालेय साहित्य खरेदीची लगबग सुरू झाली आहे. छत्री, रेनकोट, दफ्तर, वह्या व इतर साहित्य खरेदी मोठ्या प्रमाणात होत असून सर्व साहित्यच्या दरात 10 ते 20 टक्क्यांनी वाढ झाल्याचे विक्रेते सांगतात.

कागदाच्या वाढलेल्या किंमती, महागलेले प्लॅस्टिक आणि स्टेशनरी साहित्याचा तुटवडा यामुळे शैक्षणिक साहित्याच्या किंमती वाढल्या आहेत. वह्यांच्या दरात थेट 20 टक्क्यांची वाढ झाली आहे. शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीलाच पालकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

कोरोना काळात शाळा, महाविद्यालये ऑनलाईन सुरू होती. त्यामुळे शैक्षणिक साहित्याच्या विक्रीत काही प्रमाणात घट झाली, परंतु मागील वर्षापासून शाळा पूर्ववत सुरू झाल्याने वह्या, पुस्तके, दप्तर, रेनकोट यांच्या खरेदीसाठी आता पालक स्टेशनरी दुकानात जात आहेत. पंरतु येत्या नव्या शैक्षणिक वर्षात शैक्षणिक साहित्याचे वाढलेले दर पाहून पालक दबक्या पावलांनीच बाजारात जात आहेत.

वह्यांच्या दरात मोठी वाढ!

काही महिन्यांपूर्वीच शैक्षणिक साहित्य दरात वाढ झाली असून जी वही 35 रुपयांना मिळत होती, ती आता 40 रुपये झाली आहे. 105 रुपयांना मिळणारा कंपास 140 रुपये झाला असून येत्या काळात अजूनही दरात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रामुख्याने वह्यांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसते.

रेनकोट, छत्र्याही महागल्या!

जी छत्री गेल्या वर्षी 350 रुपयांना मिळत होती त्याच छत्रीची किंमत आता 400 रुपये झाली आहे. उत्तम दर्जाच्या छत्र्या 500 ते 700 रु. एक दराने विकल्या जात आहेत. रेनकोट 700 ते 1200 व त्याहून अधिक किंमतीचे उपलब्ध आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: रस्ता अडविणे, दंगल माजविणे याप्रकरणी कुंकळ्ळीत 400 भाविकांविरोधात गुन्हा

Defamatory Post Lairai Devi: अन्यथा अस्नोडा जंक्शन रोखणार! भाविकांची म्हापसा पोलिस स्थानकावर धडक

Madgaon Station News: कोकण रेल्वेची मडगाव येथे रेंट अ बाईक सुविधा; विजय सरदेसाईंचा कडाडून विरोध, आंदोलनाचा इशारा

आम्ही गप्प बसू शकत नाही...अल्पवयीन मुलीच्या गर्भपातास कोर्टाची परवानगी

Goa Weather Today: राजधानी पणजीसह गोव्यातील सात तालुक्यात वादळीवाऱ्यासह पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT