मिशन फॉर लोकलतर्फेवझाडे झुडपे साफ करताना ,तळी साफ करताना  निवृत्ती शिरोडकर
गोवा

Goa: मिशन फोर लोकल पेडणे संघटनेकडून कमळेश्वर देवळाच्या परिसराची साफसफाई

मिशन फॉर लोकल पेडणे संघटनेने कमळेश्वर देवळाच्या सभोवतालच्या भागात रस्त्यालगत वाढलेल्या झुडपांची सफाई केली

निवृत्ती शिरोडकर

मोरजी: मिशन फोर लोकल (Mission For Local) पेडणे संघटनेने रविवार दिनांक 29 ऑगस्ट रोजी कोरगाव येथे श्री. कमळेश्वर देवळाच्या सभोवतालच्या भागात रस्त्यालगत वाढलेल्या झुडपांची सफाई केली. यावेळी मिशन फॉर लोकल संघटनेचे अध्यक्ष राजन कोरगावकर (Rajan Korgaonkar), प्रवक्ते राजू नर्से (Raju Narse), कोरगाव पंचायत सदस्य वसंत देसाई व मिशन फॉर लोकल संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

मिशन फॉर लोकल संघटनेचे कार्यकर्ते

रविवारी सकाळी कमळेश्वर देवाची तळी साफ केली दरवर्षी चतुर्थीच्या निमित्ताने कोळगाव गावातील युवक ही तळी साफ करतात. यंदा त्या युवकांबरोबर मिशन फॉर लोकल संघटनेने भाग घेतला. मिशन फॉर लोकल पेडणे ही संघटना अशा प्रकारचे कार्य घेऊनच पुढे आली आहे. "सगळ्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने आज आम्ही हे कार्य हाती घेतले आहे. कोरगाव येथील साफसफाई नंतर हे कार्य असेच पुढे जाणार आहे. निसर्गाप्रती असलेले प्रेम आणि समाजसेवा आम्हाला या प्रकारचे कार्य करण्यास प्रवृत्त करून अलौकिक आनंद देते त्यामुळे येत्या पुढील काळात मिशन फॉर लोकल संघटना अशा प्रकारचे अनेक उपक्रम घेऊन पुढे येणार आहे" असे मिशन फॉर लोकल संघटनेचे अध्यक्ष राजन कोरगावकर म्हणाले.

"राजन कोरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली मिशन फॉर लोकल संघटना प्रगतीच्या दिशेने पावले टाकीत आहेत. समाजसेवेची दूरदृष्टी असलेला हा स्थानिक नेता अनेक उपक्रम राबवून पेडणे तालुक्याच्या प्रगतीस अधिक भर देणार यात शंका नाही" असे, कोरगाव पंचायतीचे पंच सदस्य वसंत देसाई म्हणाले. तसेच, "मिशन फॉर लोकल संघटनेचा या कार्यास हातभार लावलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांचे आभार आणि कौतुक आहे. आम्हाला अजून भरपूर समाजसेवा करायची आहे. तालुक्याच्या प्रगतीसाठी मिशन फॉर लोकल सदैव अग्रेसर राहणार" असे संघटनेचे प्रवक्ते राजू नर्से यांनी मत मांडले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mayem Fire Incident: वायंगिणी-मयेत आगीचा तांडव! 30 लाख रुपयांचे नुकसान; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज

Cash For Job: आमच्यावर पोलिसांमार्फत पाळत! सरदेसाई, पालेकरांचा सनसनाटी आरोप

Rashi Bhavishya 25 November 2024: उद्योजकांसाठी आजचा दिवस खास, मिळणार मोठी डील... तुमच्या राशीत दडलंय काय?

Ranbir Kapoor: राज कपूर फिल्म फेस्टिव्हलची घोषणा! IFFI 2024 मध्ये रणबीरने केलं जाहीर

Goa Fraud: शेअर मार्केटमधून चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने 100 कोटी लाटले, आरोपी लंडनला फरार; पोलिसांची शोध मोहीम सुरु!

SCROLL FOR NEXT