Rumdamol Panchayat  Dainik Gomantak
गोवा

Rumdamol Panchayat: बेकायदा मदरशावरून ग्रामसभेत खडाजंगी

रुमडामळ ग्रामसभेत पडसाद : स्थानिकांना उपद्रव; पंचांची तक्रार

गोमन्तक डिजिटल टीम

Rumdamol Panchayat रुमडामळ-दवर्ली येथील ग्रामसभा बेकायदा मदरशाच्या वादावरून गाजली. ग्रामस्थ आणि पंच सदस्यांमध्ये निर्माण झालेला वाद उफाळू नये म्हणून अखेर पोलिसांना पाचारण करावे लागले.

गेल्या सहा महिन्यांपासून प्रभाग 3 मध्ये एका घरात सुरू असलेल्या बेकायदा मदरशावरून स्थानिकांमध्ये वाद सुरू आहे. हा मदरसा बंद करावा, तो कायदेशीर आहे की नाही याची चौकशी करावी, मदरशात नेमके काय चालते याची पाहणी करावी, असे स्थानिकांनी पंचायत मंडळाला सांगितले.

पण सरपंच मुबिना फणिबंद यांनी यासंदर्भात काहीच निर्णय न दिल्याने आज ग्रामसभेत वाद उफाळून आला. सरपंच फणिबंद या ग्रामसभेला गैरहजर होत्या. उपसरपंच मुस्तफा यांच्या अध्यक्षपदाखाली ही सभा झाली.

सरपंच वारंवार रजेवर

या मदरशासंदर्भात सरपंचांनी सावध राहिले पाहिजे. यावरून काही वेगळे घडले तर त्याला सरपंच जबाबदार असतील. सरपंच फणिबंद या बेकायदा बांधकामांना लाच घेऊन परवाना देतात. तसेच एकाच समाजाच्या बाजूने निर्णय घेतात.

त्या दर 15 दिवसांनी रजेवर जातात. त्यामुळे पंचायतीच्या कामकाजावर परिणाम होत असल्याची तक्रार पंच वळवईकर यांनी केली.

रात्री भीतीचे वातावरण

एका महिलेने सांगितले की, या मदरशामुळे आम्हाला पुष्कळ त्रास सहन करावा लागतो. रात्री येथून जाताना भीतीचे वातावरण असते. रस्ते अडविले जातात. यासंदर्भात उपसरपंच मुस्तफा म्हणाले की, आम्ही हा प्रश्न सोडविण्यासाठी एक महिन्याची मुदत मागितली आहे.

व्यवस्थित चौकशी करून निर्णय घ्यायला वेळ हवा. तसेच 6 तारखेला बीडीओंकडे यासंदर्भात सुनावणी आहे. त्यांचा निर्णय काय होतो, तेही पाहावे लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: लहान मुलांना वाचविण्यासाठी जर्मन शेफर्डने बाल्कनीतून घेतली उडी; पाहा व्हिडिओ

Virat Kohli Debut: रन मशीन, चेस मास्टर... आजच्याच दिवशी क्रिकेट विश्वाला मिळाला 'किंग', 17 वर्षांच्या प्रवासातील विराटचे 3 'सुवर्ण क्षण'

Budget Friendly India Tour: दिल्ली, गोवा, जयपूर...14 दिवसांत भारत दर्शन; कसा कराल बजेटफ्रेन्डली प्रवास? वाचा प्लॅन

Viral Video: "असले मित्र नको रे बाबा!" धोकादायक मस्करीचा व्हिडिओ व्हायरल; त्याची 'ही' अवस्था पाहून नेटकरी संतप्त

Operation Sindoor: पाकिस्तानच्या ‘पळपुट्या' नौदलाची पोलखोल! ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान नौका ग्वादर बंदरात लपवल्या; सॅटेलाईट फोटोंमधून खुलासा

SCROLL FOR NEXT