Bicholim Dainik Gomantak
गोवा

Bicholim: भाजी विक्रेत्यांमध्ये ‘हमरीतुमरी’

Bicholim: डिचोली आठवडी बाजारात वाद

दैनिक गोमन्तक

Bicholim: चतुर्थी सणाच्या तोंडावर आज (बुधवारी) डिचोलीच्या आठवडी बाजारात भाजी विक्रेत्यांच्या दोन गटातील वाद उफाळून आला. सकाळीच भाजी विक्रेत्यांमध्ये ‘हमरीतुमरी’चा प्रकारही घडला. पोलिसांनाही पाचारण करण्याची पाळी आली. सकाळचा वाद शमून बाजारातील स्थिती सुरळीत झाल्यानंतर पुन्हा दुपारी वाद निर्माण झाला.

आठवडी बाजारात भाजी विक्री करणाऱ्या लमाणी भाजी विक्रेत्यांमध्ये क्षुल्लक कारणावरून अधूनमधून वाद निर्माण होत असतो. यापूर्वी हाणामारीचे प्रकारही घडले आहेत. आता ऐन चतुर्थीच्या तोंडावर भाजी विक्रेत्यांमध्ये वाद निर्माण झाल्याने बाजारहाटासाठी येणारे ग्राहक धास्तावले आहेत.

भाज्यांचे दर स्थिर : चतुर्थीच्या तोंडावर भाज्या महागणार असल्याचे संकेत असले, तरी आज आठवडी बाजारात राज्याबाहेरील भाज्यांचे दर स्थिर होते. मात्र चतुर्थीनिमित्त पुढील दोन दिवसात भाज्यांचे दर दुप्पट होणार असल्याचे संकेत आहेत. आज आठवडी बाजारात मोठी गर्दी उसळणार. अशी विक्रेत्यांची अपेक्षा होती. मात्र अपेक्षेप्रमाणे बाजारात ग्राहक दिसून आले नाहीत. दिवसभराच्या तुलनेत सायंकाळी मात्र बाजारात वर्दळ वाढली होती. पुढील दोन दिवसात बाजारात गर्दी उसळणार, हे निश्चित आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय! एससी-ओबीसी लाभार्थ्यांना दिलासा; थकीत कर्जावरील 3 कोटीच्या व्याजाची माफी

Mopa Airport: 2 ते 5 मिनिटांचा नियम जाचक! टॅक्सीचालकांत संताप; मोपा विमानतळावर ‘जीएमआर’च्या नव्या धोरणामुळे गोंधळ

25 जणांचा मृत्यू झालेल्या ‘बर्च’ला परवानगी केवळ सरपंचांचा निर्णय नाही! वकिलांचा युक्तिवाद; अटकपूर्व जामिनावर होणार सुनावणी

Goa Farmers Policy: ‘शेतकरी’ची व्याख्या बदलणार! विपणन मंडळाचा कारभार कृषी खात्‍याकडे; हिवाळी अधिवेशनात विधेयक होणार सादर

Goa Politics: खरी कुजबुज; पालेकरांकडे भाजपचाही पर्याय?

SCROLL FOR NEXT