Bicholim Theft Case: डिचोली बाजारात पाकिटमारांची टोळी

Bicholim Theft Case: महिलेकडील पैशांसह मोबाईल पळवला
Bicholim Theft Case
Bicholim Theft CaseDainik Gomantak

Bicholim Theft Case: चतुर्थीच्या गडबडीत डिचोलीत पाकिटमार चोरांची टोळी सक्रिय झाली असून, बाजारहाट करताना ग्राहकांना आता सतर्कता बाळगावी लागणार आहे. आज (बुधवारी) या पाकिटमारांनी डिचोलीत एका ग्राहक महिलेलेचे पैशांचे पाकिट आणि मोबाईल हातोहात लंपास केला.

Bicholim Theft Case
Goa Ganesh Chaturthi 2023: आकर्षक गणेशमूर्ती बनविण्‍याची मिळालीय ‘सिद्धी’

हा प्रकार आज सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास शहरातील एका नामांकित संस्थेच्या स्वयंसेवी भांडारात घडला. हातुर्ली-मये येथील एक ज्येष्ठ महिला वैशाली पिळगावकर हिने संबंधित स्वयंसेवी भांडारातून सामान खरेदी केल्यानंतर आपल्या पतीसमवेत काउंटरवर बिल चुकते करत होत्या. यावेळी बाहेरून आलेल्या एका युवकाने तिच्या सामानातील पैशांचे पाकीट आणि मोबाईल सहज उचलून पळ काढला.

घटना सीसी टीव्हीत कैद

संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज तपासून पाहिली. त्यावेळी एक युवक बाहेरून काउंटरजवळ आला आणि त्याने पैशांचे पाकीट आणि मोबाईल चोरल्याचे स्पष्ट दिसून आले. ही चोरी होताना त्याठिकाणी आणखी तीन ते चार युवक संशयास्पद अवस्थेत घुटमळत असल्याचे दिसून आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com