60000 Ration Cards Cancelled to Prevent Misuse in Goa
सासष्टी: रेशन कार्डचा होणारा दुरुपयोग रोखण्यासाठी नागरी पुरवठा खात्याने ६० हजार रेशन कार्ड रद्द केली आहेत. गेल्या तीन वर्षांपासून वापरात नसलेल्या रेशन कार्डची खात्याने कसून चौकशी केली. गुरुवारी मडगावात झालेल्या रास्तभाव दुकान मालकांच्या बैठकीत नागरी पुरवठा सचिव संजीत रॉड्रिग्स यांनी ही माहिती दिली.
जर रास्त भाव दुकान मालकांना एखाद्या रेशन कार्डबद्दल संशय येत असेल तर त्यांनी ही बाब पंचायत किंवा ग्रामसभेत उपस्थित करावी, अशी सूचना रॉड्रिग्स यांनी यावेळी दिली.
केंद्र सरकारने रास्त भाव दुकान मालकांसाठी एक खास योजना तयार केली असून त्याची अंमलबजावणी डिसेंबरपासून केली जाईल. प्रत्येक दुकानदाराला महिन्याकाठी बारीक सारीक खर्चांसाठी ९५०० रुपये दिले जातील. शिवाय सरकारी गोदामातून दुकानापर्यंत साहित्य मोफत पुरविले जाईल, असेही रॉड्रिग्स यांनी सांगितले.
दिवाळीत साखर व धान्य प्रत्येकी दोन-दोन किलो ज्यादा दिले जाईल, असे नागरी पुरवठामंत्री रवी नाईक यांनी जाहीर केले. रास्त भाव दुकान मालकांनी कमिशन वाढवून देण्याची मागणी केली. मात्र, रॉड्रिग्स यांनी गोव्यात सर्वाधिक कमिशन दिले जाते. त्यामुळे ही मागणी मान्य करता येणार नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.