City Bus Accidents In Goa
सासष्टी: सध्या सिटी बसेसची संख्या मडगाव व परिसरात वाढली असून प्रवाशांना घेण्यासाठी त्यांच्यामध्ये दररोज स्पर्धा लागलेली दिसत आहे. ही स्पर्धा अनेकवेळा अपघातांना निमंत्रणही देते.
प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रत्येक पाच मिनिटांनी सिटी व इतर बसेसना वाहतूक खात्याने मान्यता दिली आहे. मात्र, बसवाले त्याचा गैरफायदा घेऊ लागले आहेत. रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा होत असतो, त्याचे एक कारण हे बसवाले असल्याचे लोकांचे म्हणणे आहे.
एक तर बसवाले गती वाढवतात व एकमेकांना मागे घालण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे दिवसा एक-दोन अपघात होत असतात. दुसऱ्या बाजूने काही बसचालक संथगतीने जातात, त्यामुळेही वाहतूक खोळंबते.
पोलिस कधी-कधी लोकांच्या डोळ्यांना पाणी लावण्यासाठी या बसवाल्यांना दिखाव्यासाठी दमदाटी करतात; पण कडक कारवाई करीत नाहीत किंवा त्यांना तालांवही देत नाहीत. याबाबत लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
परवा नावेली येथे अशीच दोन बसगाड्यांमध्ये स्पर्धा सुरू असताना अपघात झाला व एका इनोवा कारचा चक्काचूर झाला. दैव बलवत्तर म्हणून कारमधील माणसांना इजा झाली नाही.
याबद्दल एका स्थानिकाने सांगितले की, दोन बसेस एवढ्या गतीने ओव्हरटेक करतात, त्यामुळे पायी चालत जाणाऱ्यालाही धोका निर्माण होण्याची शक्यता उद्भवते. पोलिस बसचालकांवर काहीही कारवाई करीत नाहीत.
नावेली येथे बगल रस्ता आहे. मात्र, लोक त्याचा वापर करीत नाहीत याचे कारण तिथे सूचना फलक नाहीत, असे फुर्तादो नामक स्थानिकाने सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.