Citizens protest against Western Bypass work in Benaulim, police deployed  Dainik Gomantak
गोवा

बाणावलीत वेस्टर्न बायपास कामाला नागरिकांचा विरोध, पोलीस बंदोबस्त तैनात

पंचायतीने या पूर्वीच या कामाच्या विरोधात पावले उचलायला हवी होती

दैनिक गोमन्तक

सासष्टी : पश्चिम बगल रस्त्याचे काम जोरात सुरु झाले आहे, त्याला बाणावलीतील नागरीकांनी विरोध करत आज आंदोलन पुकारले आहे. शेकडो नागरीक येथे जमले. त्यात बाणावलीचे आमदार वेन्झी व्हिएगश, आम आदमी पक्षाचे नेते अमीत पालेकर, पर्यावरण वादी सिद्धार्थ कारापुरकर, बाणावली पंचायतीच्या पंच फेलिसिसा नॉरॉन्हा उपस्थित होत्या.

आमदार (MLA) वेन्झी व्हिएगश यांनी आठवड्याच्या शेवटच्या सुट्टीच्या दिवसात पश्चिम बगल रस्त्याचे काम सुरु आहे, त्याला विरोध दर्शवला. नागरिकांना न्यायालयात जाण्याची संधी दिली पाहीजे असे त्यांनी यावेळी सांगितले.

सोमवारी बाणावली पंचायत (Panchayat) मध्ये जाऊन त्यांनी जो ठराव घेतला आहे, त्याचा अभ्यास करुन पुढील कारवाई केली जाईल व न्यायालयात अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली जाईल असे आमदार व्हिएगश यानी सांगितले. पंचायती्ने या पुर्वी या कामाच्या विरोधात पावले उचलायला पाहिजे होती. पण माजी आमदाराने या आंदोलनाला पाठिंबाच दिला नाही असेही आमदार व्हिएगश म्हणाले. पश्चिम बगल रस्त्यासाठी ज्या शेतांमध्ये माती भराव चालु आहे, त्यामुळे पावसाऴ्यात पुर येण्याची भिती आहे. त्याचसाठी हे आंदोलन (movement) असल्याचे व्हिएगश यांनी सांगितले.

बाणावलीच्या (Benaulim) पंच फेलिसिया नॉरॉन्हा यांनी सांगितले की पंचायतीन दोन ठराव मंजुर केले आहेत. एक या संदर्भात न्यायालयीन (court) लढाईसाठी वकिलाची नियुक्ती व दुसरा ठराव कामाला स्थगिती मिळवण्यासाठी. आम्ही पंचायतीच्या वतीने माजी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मंत्र्याची भेट घेतली होती व त्यांनी या संदर्भात योग्य विचार करण्याचे आश्र्वासन दिले होते.

दक्षिण गोव्याचे (goa) खासदार फ्रांसिस सार्दीनची भेट घेऊन त्यांना या संबंधीची माहिती दिली होती. केवळ पंचायतीने पुढाकार घेऊन भागणार नाही. शेतकऱ्यांनीही पुढे यायला पाहिजे असे नॉरॉन्हा यांनी सांगितले. पंचायतीने अॅड. धवल जव्हेरी याची नियुक्ती केली असल्याचे तिने सांगितले.

पर्यावरणवादी सिद्धार्थ कारापुरकर यांनी सांगितले की आमचा बायपास रस्त्याला विरोध नाही. पण हा रस्ता स्टिल्टवर बांधलेला आम्हाला हवा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT